एक आरोपी... तपासासाठी तब्बल सव्वादोनशे पोलीस

By Admin | Updated: December 19, 2014 01:02 IST2014-12-19T00:25:50+5:302014-12-19T01:02:51+5:30

विनोद काकडे, औरंगाबाद तीन महिन्यांपासून पोलिसांना वाँटेड. शोधासाठी झटतोय पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा तब्बल २१५ जणांचा फौजफाटा,

One accused ... Police officers for checking | एक आरोपी... तपासासाठी तब्बल सव्वादोनशे पोलीस

एक आरोपी... तपासासाठी तब्बल सव्वादोनशे पोलीस

विनोद काकडे, औरंगाबाद
नाव : गणेश संजय गायकवाड. धंदा : वीटभट्टी मजूर. गुन्हा : बलात्कार आणि खून, या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून पोलिसांना वाँटेड. शोधासाठी झटतोय पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा तब्बल २१५ जणांचा फौजफाटा, ८२ वेळा कोम्बिंग आॅपरेशन राबविले... पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड शून्य, त्यामुळे सराईतही नाही. असे असतानाही एक साधा गुन्हेगार सापडत नाही, यावरून औरंगाबाद पोलिसांच्या ‘गुणवत्ते’चा अंदाज येतो!
आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या आमिनाबीचा मिटमिटा परिसरात बलात्कार करून खून केल्याचा प्रकार २९ आॅगस्ट रोजी उघडकीस आला होता. तपासात हे कृत्य मिटमिटा परिसरातच वीटभट्टीवर काम करणारा आरोपी गणेश गायकवाड (रा. गदाणा, खुलताबाद) याने केल्याचे उघडकीस आले. तसे पुरावे पोलिसांना सापडले. गायकवाडविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बलात्कार व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आरोपीच्या अटकेसाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा अंदोलनेही केली. आपल्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये रोष वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर गणेशच्या शोधासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा अशी मिळून तब्बल दहा विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये ५ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक व २०० पोलीस कर्मचारी असा सव्वादोनशे जणांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकारी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून होते. इतक्यावरच भागले नाही म्हणून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ग्रामरक्षक दल, प्रत्येक गावातील चावडी, तंटामुक्त सदस्य, मित्रमंडळे, भिल्ल समाजाचे अध्यक्ष, समाजसेवकांचीही मदत घेतली.

Web Title: One accused ... Police officers for checking