शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती रखडली

By admin | Updated: June 6, 2014 01:06 IST

जालना : शहरातील विद्युत पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने सुरू केल्यानंतरही असंख्य दिवे बंद आहेत. ५० लाखांची तरतूद असूनही

जालना : शहरातील विद्युत पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने सुरू केल्यानंतरही असंख्य दिवे बंद आहेत. ५० लाखांची तरतूद असूनही पथदिव्यांची दुरूस्ती रखडली असून परिणामी प्रमुख रस्ते अंधारातच आहेत. मात्र दुसरीकडे पालिकेने काही रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यावर भर दिल्याने जुन्या पथदिव्यांची दुरूस्ती होणार किंवा नाही, याविषयी शंका निर्माण झाली आहे.
शहरात विविध रस्त्यांवर सुमारे १४०० पथदिवे आहेत. मात्र यापैकी सुमारे एक हजार पथदिवे बंद असून त्याच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद असतानाही दुरूस्तीच्या कामांना मुहूर्त मिळेनासा झाला आहे. महावितरणने १४ कोटींच्या वीज बिलांच्या थकबाकीपोटी गेल्या दोन वर्षांपूर्वी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. पालिकेच्या अनेक प्रयत्नानंतर, नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांच्या उपोषणानंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. अखेर पालिकेने १ कोटी ८० लाखांचा भरणा केला. त्यानंतर महावितरणने अक्षय प्रकाश योजनेअंतर्गत पालिकेला वीज भरणा करण्यासाठीची सवलत देऊन हप्ते पाडून दिले व वीजपुरवठा सुरू केला. मात्र वीजपुरवठा सुरू करून देखील पालिकेचे एक हजार पथदिवे बंद असल्याने शहरातील बहुसंख्य रस्ते अंधारातच आहेत.
या अंधाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेने विद्युत दिवे बसविण्यासाठी व त्याची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जी एजन्सी नियुक्त केली, त्या एजन्सीला नियमित बिले मिळत नसल्याची पालिकेच्या आवारात चर्चा आहे. त्यामुळेच सदर एजन्सी विद्युत दिव्यांच्या दुरूस्तीला तयार होत नसल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना विचारणा केली असता, बंद पथदिव्यांची दुरूस्ती होणार असून त्यासाठी अपेक्षित निधीची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शहरात प्रमुख रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यात येणार असल्याने अशा रस्त्यांवरील दिव्यांच्या दुरूस्तीपेक्षा तेथे नवीन दिवे बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
दिव्यांची दुरूस्ती
परवडेना
शहरातील पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी ३० ते ४० लाखांचा खर्च लागतो. त्यापेक्षा एलएडी दिवे बसविल्यास पाच वर्षे त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी संबंधित एजन्सीवर राहते. त्यामुळे जुन्या दिव्यांच्या दुरूस्तीचा खर्च पालिकेला परवडेनासा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दहा रस्त्यांवर लागणार एलएडी
शहरातील प्रमुख रस्त्यांवर एलएडी दिवे बसविण्यावर भर देण्याचे पालिकेने ठरविले आहे. त्यानुसार १० रस्त्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार येथे एलएडी दिवे बसविण्यात आले.