शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राक्षसवाडीत वृद्धाचा खून

By admin | Updated: March 10, 2016 00:51 IST

अंबाजोगाई : पैशाच्या व्यवहारातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. ही घटना राक्षसवाडी येथे घडली.

अंबाजोगाई : पैशाच्या व्यवहारातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. ही घटना राक्षसवाडी येथे घडली. बळीराम दाजीबा वाघमोडे (वय ८० रा. राक्षसवाडी ता. अंबाजोगाई) असे मयत वृद्धाचे नाव आहे. गावातीलच रामप्रसाद भीमराव गडदे, अशा रामप्रसाद गडदे यांचा आरोपींत समावेश आहे. गडदे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी वाघमोडे यांना उसणे पैसे दिले होते. ते परत करण्यासाठी गडदे यांचा त्यांच्याकडे तगादा सुरु होता. या व्यवहारातून दोन्ही कुटुंबात अनेकदा कडाक्याची भांडणेही झाली होती. मंगळवारी सायंकाळी गडदे दाम्पत्य पैसे मागण्यासाठी वाघमोडे यांच्या घरी गेले. त्यांनी उसणे पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. गडदे दाम्पत्याने बळीराम वाघमोडे यांना काठी व दगडाने मारहाण केली. यावेळी त्यांची पत्नी हौसाबाई धावून आल्या;परंतु त्यांना बाजूला ढकलून बळीराम यांना मारहाण सुरुच होती. हौसाबाई यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी हौसाबाई यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात गडदे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोघेही फरार आहेत. (वार्ताहर)