अधिकाऱ्यांनो, दालनातून बाहेर निघा!

By Admin | Updated: December 19, 2014 01:00 IST2014-12-19T00:15:45+5:302014-12-19T01:00:21+5:30

औरंगाबाद : विभागप्रमुखांनो, दालनातून बाहेर निघा. फिल्डवर जा. कामाचा आढावा घ्या. गुणवत्ता साधा; अन्यथा... असे धमकीवजा आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी केले.

Officers, leave the room! | अधिकाऱ्यांनो, दालनातून बाहेर निघा!

अधिकाऱ्यांनो, दालनातून बाहेर निघा!

औरंगाबाद : विभागप्रमुखांनो, दालनातून बाहेर निघा. फिल्डवर जा. कामाचा आढावा घ्या. गुणवत्ता साधा; अन्यथा... असे धमकीवजा आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी केले.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या शाळाभेटी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी घटल्यामुळे अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याची उणीव शिक्षण व आरोग्य सभापती
विनोद तांबे यांनी अधोरेखित केल्यानंतर चौधरी यांनीही अधिकाऱ्यांना फिल्डवर्कचा सल्ला दिला.
पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले की, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी मुख्यालयाचा दिवस वगळता इतर दिवशी फिल्डवर्कसाठी जाणे अपेक्षित आहे. नव्हे या अधिकाऱ्यांची ती जबाबदारीच आहे; परंतु अधिकारी फिल्डवर जात नसल्यामुळे अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. आपल्या सहकाऱ्यांवर त्यांचा वचक राहत नाही. त्यामुळे कामाची गुणवत्ताही राखली जात नाही. सोमवार नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवून इतर दिवसांत अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाण्याच्या सूचना सर्वांना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Officers, leave the room!