शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:01 IST

महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

ठळक मुद्देसुभाष देसाई : पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’मध्ये प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या सहकार्याने चौथ्या ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’चे आयोजन केले आहे. या कॉन्क्लेव्हला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर ‘पीईएस’चे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रकाश कोकीळ, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी देसाई म्हणाले की, सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन घडविण्याचा निर्धार केला आहे. या धोरणाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या एक लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी खाजगी वाहतूक आणि वाहतूक खरेदीदारांना धोरणाच्या कालावधीत अंतिम वापरकर्ता अनुदान देण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेसाठी आयआयटीचे प्रोफेसर के. मुन्शी, इलेक्ट्रिक कारचे संस्थापक डॉ. रुशेन चेहल, मिताली मिश्रा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समन्वयक राहुल देशपांडे यांनी केले.आॅरिक सिटी भारतात सर्वोत्कृष्ट असेलमराठवाड्यात अधिकाधिक चांगले उद्योग येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेत उभारण्यात येत असलेली आॅरिक सिटी ही भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योगनगरी असेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.