शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

"...हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार"; ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगे यांचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:47 IST

"पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. नियोजनबद्ध पद्धतीने येणे, राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने निघाले. हे लगेच लक्षात येते. ठरवून असलेले लगेच लक्षात येते."

आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (ओबीसी) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणाऱ्यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणतंय. असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना (ओबीसी) म्हणतच नाही. एक दिवस त्यांचेही आंदोलन संपणार आहे. आमचेही संपणार आहे. सरकार डाव खेळत आहे. पण सरकारच्या एक लक्षात येत नाही. हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणीत येणार," असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.

उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. नियोजनबद्ध पद्धतीने येणे, राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने निघाले. हे लगेच लक्षात येते. ठरवून असलेले लगेच लक्षात येते. तू बस मी येतोच दुसऱ्या दिवशी... तेथे बसलेल्या (उपोषणाला) बांधवांना (ओबीसी बांधव) दोष देऊन काही उपयोग नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे."

बांधवांनो आत्महत्या करू नका... -मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की, आपल्याला कधी आरक्षण मिळणारच नव्हते. ते आता मिळू लागले आहे. यामुळे आरक्षण मिळत नाही म्हणून कुणी आत्महत्या करू नका. मी आरक्षण दिल्याशिवाय हटनार नाही."

मात्र, त्या आरक्षणात कुणाचा नंबर लागला नाही, तरी निराश होऊ आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्याने कुणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका. पुन्हा प्रचत्न करा. तुम्हाला काही दिवसांनी आरक्षण मिळेल. त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा, कारण तुमचे भविष्य आत्महत्या केल्याने घडणार नाही.

मी आरक्षण मिळवून देणारच -तुम्ही कुणीही आत्महत्या करू नका. आज एखाद्या टक्क्याने हुकले असाल तर हुकू द्या. मी आरक्षण मिळवूनच देणार. मी आरक्षण घेतल्याशिवाय हाटत नाही. मला एकही मराठी समाजाचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारOBC Reservationओबीसी आरक्षण