नर्सिंगच्या विद्यार्थिंनींचे उपोषण

By Admin | Updated: May 29, 2014 00:52 IST2014-05-29T00:45:17+5:302014-05-29T00:52:05+5:30

नांदेड: नर्सिंगचा कोर्स उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र मागितल्यानंतर विद्यार्थिनींना शिवीगाळ करणार्‍या संस्थाचालक व शिक्षकाविरुद्ध नऊ विद्यार्थिंनी बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Nursing students' hunger strike | नर्सिंगच्या विद्यार्थिंनींचे उपोषण

नर्सिंगच्या विद्यार्थिंनींचे उपोषण

नांदेड: नर्सिंगचा कोर्स उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र मागितल्यानंतर विद्यार्थिनींना शिवीगाळ करणार्‍या संस्थाचालक व शिक्षकाविरुद्ध नऊ विद्यार्थिंनी बुधवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. मुखेड येथील श्री दत्त नर्सिंग इन्स्टिट्यूट येथून २०१३ या वर्षात दिलेल्या द्वितीय परीक्षेत १७ विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या. यानंतर सदर विद्यार्थिंनी संस्थेकडे उत्तीर्ण झालेले मार्कमेमो मागण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर मुलींनी पैसे देण्यासाठी नकार दिल्यानंतर संस्थेचे सचिव व शिक्षक यांनी मुलींना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांना धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर सदर मुलींनी एसएफआय च्या मुखेड कमिटीकडे तक्रार केल्यानंतर संघटनेचे अंकुश माचेवाड व शिष्टमंडळाच्याव् ातीने मुखेड तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांचे धरणे केले होते. यानंतर सदर संस्थेकडून प्रमाणपत्र देण्याचे अश्वासन देवूनही अद्यापपर्यंत विद्यार्थिंनींना मार्कमेमो मिळाले नाहीत. या निषेधार्थ नर्सिंगच्या ९ विद्यार्थिंनी २८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणात एसएफआयचे बालाजी कलेटवाड, अंकुश माचेवाड, अंकिता बोईभाडे, मनीषा भदरे, रंजना सोनकांबळे, गरजना सोनकांबळे, सुमन तोहरे, मनीषा जोंधळे, सुरेखा गड्डमवार, पिंकी मोत्तेकर व सीमा बोईनर आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Nursing students' hunger strike