सक्रिय रुग्णांची संख्या आली शंभरच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:57+5:302021-02-05T04:12:57+5:30

९१ बाधितांवर उपचार सुरू- ४४ बाधितांची भर, १ मृत्यू, ५५ जणांना सुटी --- औरंगाबाद : तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्ह्यातील ...

The number of active patients was within a hundred | सक्रिय रुग्णांची संख्या आली शंभरच्या आत

सक्रिय रुग्णांची संख्या आली शंभरच्या आत

९१ बाधितांवर उपचार सुरू- ४४ बाधितांची भर, १ मृत्यू, ५५ जणांना सुटी

---

औरंगाबाद : तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना संक्रमण शहरात सुरू झाल्यावर २९ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या १०० होती. त्यानंतर पहिल्यांदा उपचार सुरू रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. बाधित आढळण्याचे प्रमाण ५० च्या आत आलेले असताना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासायक ठरली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी ४४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात कुशलनगरातील ८८ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. दिवसभरात ५५ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश होता. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ८९२ झाली असून आजपर्यंत ४५ हजार ५६५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १२३६ जणांचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याने एकूण ९१ बाधितांवर उपचार सुरु आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीतील ३७ रुग्ण

--

ईटखेडा १, मनपा परिसर १, वेदांतनगर १, पदमपुरा १, एस.बी.कॉलनी १, जाधवमंडी २, सातारा परिसर १, बजाजनगर १, एन-अकरा १, होनाजीनगर १, भगतसिंगनगर १, विश्रांतीनगर १, म्हसोबानगर १, पिसादेवी १, अयोध्यानगर १, एन-नऊ १, मिल्ट्री हॉस्पिटल १, अन्य १८

-

ग्रामीण भागातील ७ रुग्ण

--

वरुड काझी ३, स्वामी विवेकानंद नगर, फुलंब्री १, बजाजनगर १, साईनगर, नगर रोड १, अन्य १ .

Web Title: The number of active patients was within a hundred