आता जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख मुक्कामी

By Admin | Updated: May 29, 2014 00:52 IST2014-05-29T00:47:49+5:302014-05-29T00:52:27+5:30

नांदेड : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक गावात मुक्कामी राहत आहेत़

Now Zilla Parishad's head of the party | आता जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख मुक्कामी

आता जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख मुक्कामी

नांदेड : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक गावात मुक्कामी राहत आहेत़ यातून ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत, यासंदर्भात चर्चा करून त्यांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ नायगाव तालुक्यातील खंडगाव येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात जि़प़चे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला़ ते म्हणाले, शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून राबविल्यास गावाचा विकास होईल़ नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण समृद्ध ग्रामविकास योजना, वृक्षलागवड, पाणीशुद्धीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या ग्रामविकासासाठी लाभदायक आहेत़ यावेळी सरपंच सुरेश पाटील कदम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, कृषी पर्यवेक्षक एस़ एऩ राचेवाड, कृषी सहायक एम़ के़ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी गावात कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ८ स्वच्छता मित्रांना टी-शर्ट, टोपी व ग्रामगीता देवून सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक टी़जी़ रातोळीकर, ग्राम विकास अधिकारी ढगे, देवीदास जाधव, बालाजी जोनकले, मकसूद शेख, अविनाश कदम, शिवाजी तोटवाड, श्रीकांत मसलगे, बालाजी गोपलवाड, आनंदा बरडे, महेश जाधव आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: Now Zilla Parishad's head of the party