शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल !

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

बीड : विकास कोण करतो ? हे जनतेला चांगलेच ठावूक आहे़ निवडणुका आल्या की केवळ जनतेपुढे आरडाओरड करायची आणि विरोधासाठी विरोध करायचा़ परंतु

बीड : विकास कोण करतो ? हे जनतेला चांगलेच ठावूक आहे़ निवडणुका आल्या की केवळ जनतेपुढे आरडाओरड करायची आणि विरोधासाठी विरोध करायचा़ परंतु अशा लोकांना आता जनताच धडा शिकवेल, अशा शब्दात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी विरोधकांवर पलटवार केला़येथील नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते़ राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आ़ सय्यद सलीम, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अ‍ॅड. डी. बी. बागल, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे, अरूण डाके, अ‍ॅड. शेख शफीक, आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री क्षीरसागर म्हणाले की, २०१२ पासून मी स्वत: बीडच्या बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न करत होतो़ एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे येथील बसस्थानकाच्या नूतनीकरण प्रस्तावासंदर्भात मी विनंती केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन काम मार्गी लावले़ नूतन बांधकामासाठी १६ कोटी १२ लक्ष रूपयाचा निधी मिळाला आहे.क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यशबीड बसस्थानक नुतनीकरणाचा पालकमंत्री जयदत्त क्षीरसागरांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे मी अनेकवेळा मंत्रालयात पाहिले आहे. मी केवळ प्रस्ताव बनवून राज्य शासनाकडे पाठविण्याचे काम केले आहे. मात्र प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे काम क्षीरसागरांनी केले आहे. त्यांच्यामुळेच नवीन बसस्थानकाची इमारत होत आहे, असे सांगून जीवनराव गोरे पुढे म्हणाले की, नेत्यांनी सहा महिन्यातून एकदा तरी आमच्या बसगाडीने प्रवास करावा. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांवर देखील लक्ष राहिल व एसटीच्या समस्या देखील तुमच्या लक्षात येतील, अशी अपेक्षा गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.लॉलीपॉप लागणाऱ्या नेत्यांना विकास काय समजतो ?संपूर्ण जिल्हयात असो की बीड विधानसभा मतदार संघात असो, विकास कोण करते हे जनतेला चांगले माहित आहे. ज्यांना पनवेल ते बीड प्रवासात लॉलीपॉप लागते, त्यांना विकास काय कळणार, असा टोला यावेळी पालकमंत्री क्षीरसागर यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.