शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

्रपूररेषेतील १ हजार कुटुंबांना नोटिसा

By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत येणाऱ्या शहरातील १ हजार मालमत्ताधारकांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली

नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत येणाऱ्या शहरातील १ हजार मालमत्ताधारकांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात आली असून मोडकळीस आलेल्या इमारतीची दुरूस्ती करून मजबूत बांधकाम करण्याची किंवा पाडण्याची सूचना देण्यात आली आहे़शहरातील लोकवस्ती असलेला बराचसा भाग गोदावरी नदीकाठावर वसला आहे़ अतिवृष्टीनंतर शहरातील काही सखल भागात अधिक पाणी साचून कुटुंबाची जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पूर पातळीत ज्या कुटुंबाचे वास्तव्य आहे़ त्यांना पूर परिस्थितीच्या कालावधीत नुकसानीचा धोका संभवतो़ अशा संबंधित मालमत्ता धारकांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ चे उल्लंघन करून नियमितच्या पूरग्रस्त भागात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यानुसार संबंधित कुटुंबांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून इतर सुरक्षित जागेवर स्थलांतरण करण्याच्या नोटिसा मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत बजावण्यात आल्या आहेत़ पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता अधिक असते़ त्यानुसार मालमत्ताधारकांना इमारत निरीक्षकांच्या अहवालावरून इमारत पाडण्याचे आवाहन केले आहे़ वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ४४५ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त एस़ टी़ मोरे यांनी दिली़ पूररेषेतील गोवर्धनघाट टेकडी, नालागुट्टाचाळ, खडकपुरा, शनिमहाराज मंदिर नाल्याजवळील कुटुंबांना नोटीस देवून घरे रिकामे करण्याविषयी कळविले आहे़ संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे मोरे यांनी सांगितले़ क्षेत्रीय क्रं ३ इतवारा भागातील साडेतीनशे कुटुंबांना नोटिसा बजावल्याचे सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांनी सांगितले़ तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बेग यांनी पावसाळापूर्व कामे जलदगतीने सुरू असून मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे़ या मोहिमेसाठी घनकचरा व्यवस्थानाच्या ठेकेदाराचे ५० आणि महापालिकेत नियमित सफाई करणारे २० मजूर याप्रमाणे ७० जणांचे मनुष्यबळ, तसेच २ पोकलेन, २ जेसीबी व २ नाला कटर मशीन व नालेसफाईचे इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे़(प्रतिनिधी)