मनपा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:51:06+5:302014-05-27T01:01:49+5:30

नांदेड : राज्यातील महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला

Nomination bye election program | मनपा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

मनपा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड : राज्यातील महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महापालिकेतील प्रभाग क्रं़ ९ अ साठी २९ जून रोजी मतदान होणार आहे़ महापालिकेतील प्रभाग क्रं़ ९ मधील (कैलासनगर, श्रीनगर ) काँग्रेसचे नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यानंतर या रिक्त पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़ नामनिर्देशनपत्रे देणे - ३ जून ते ९ जून, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, १० जूऩ वेळ - सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत , नामनिर्देशपत्रे स्वीकारणे - ३ जून ते १० जून, वेळ - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशपत्रांची छाननी - ११ जूऩ वेळ- सकाळी ११ वाजेपासूऩ उमेदवारी मागे घेण्याची अंतिम दिनांक - १३ जूऩ वेळ- दुपारी ३ वाजेपर्यंत़ निवडणूक चिन्हे वाटप- १४ जूऩ वेळ - उमेदवारांची अंतिम यादी - १४ जूऩ मतदान केंद्राची यादी- १४ जूऩ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे - १४ जूऩ मतदानाचा दिनांक - २९ जूऩ वेळ - सकाळी ७़३० ते सायंकाळी ५़३० वाजेपर्यंत़ मतमोजणी- ३० जून रोजी़ (प्रतिनिधी) २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ अ मधून काँग्रेसचे सुधाकर पांढरे हे शिवसेनेचे उमेदवार प्रमोद खेडकर यांना पराभूत करून ६५१ मताधिक्याने विजयी झाले होते़ नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केला़ नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती़

Web Title: Nomination bye election program