शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सेलू शहराला पाणीटंचाईचे ‘नो टेन्शन’

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

सेलू : निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने यावर्षी सेलू शहराला पाणीटंचाईचे कोणतेही टेन्शन नाही़ यामुळे उन्हाळ्यातही दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़

सेलू : निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने यावर्षी सेलू शहराला पाणीटंचाईचे कोणतेही टेन्शन नाही़ यामुळे उन्हाळ्यातही दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रथमच निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला़ त्यामुळे अनेक गावांची पाणीटंचाईपासून सुटका झाली आहे़ अनेक वर्षांपासून सेलू शहराला दुधना नदीच्या राजवाडी पात्रातून सेलू शहराला पाणीपुरवठा जुन्या लाईनवरून करण्यात येतो़ त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात राजवाडी येथील दुधना नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर शहराला पाणीटंचाई भासत असे़ त्यामुळे नगरपालिका उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्रात खड्डे खोदून पाणी एकत्र करून पाणीपुरवठा करण्याची कसरत करीत होती़ परंतु, काही वर्षापूर्वीच शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पाच्या येवला पुनर्वसन हे शहरातील तीन जलकुंभांना पाईपलाईन जोडण्यात आली़ त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून शहरातील तिन्ही जलकुंभ भरण्यात येत आहेत़ या योजनेचे जलशुद्धीकरण प्रकल्प सातोना रस्त्यावर उभारण्यात आला आहे़ तसेच इतर कामेही अंतिम टप्प्यात आहेत़ शहराला दररोज १३ लाख लिटर पाणी लागते़ सध्या तीन जलकुंभातून पाणी वितरित केले जाते़ वाढीव पाणीपुरवठा योजनेत इतर जलकुंभाचे कामे करण्यात येत आहेत़ सध्या निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी मिळत आहे़ मात्र जलकुंभाची क्षमता कमी असल्यामुळे काही भागात दोन दिवसाआड तर काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत होते़ मात्र यावर्षी दुधना प्रकल्पात पाणीसाठा असल्यामुळे नगरपालिकेलाही पाणीपुरवठा करताना अडचण राहिलेली नाही़ परिणामी टंचाईच्या झळापासून शहराला मुक्तता मिळाली आहे़ (प्रतिनिधी)निम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ सध्या तीन जुन्या जलकुंभातून पाणी वितरित केले जाते़ शहराचा विस्तार पाहता तीन जलकुंभ अपुरे पडतात़ मात्र नवीन योजनेतून जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज शहराला पाणीपुरवठा होणार आहे़ उन्हाळ्यातही शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू असून, निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे सेलू शहराला पाणीटंचाईची कुठलीही भिती नाही़ निम्न दुधना प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पंप हाऊसलाही एक्सप्रेस लाईन आहे़ त्यामुळे शहराला पाणीटंचाईचे कुठलेही टेन्शन नसल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी दिली़