शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल भारत’चे वाजले ‘टमरेल’!

By admin | Updated: May 23, 2014 00:17 IST

बीड: घर तिथे शौचालय... हा उद्देश घेऊन सुरु केलेली ‘निर्मल भारत’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली गेली नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

 बीड: घर तिथे शौचालय... हा उद्देश घेऊन सुरु केलेली ‘निर्मल भारत’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली गेली नसल्याचे चित्र पुढे आले आहे. गतवर्षी जिल्ह्याला ३१ हजार शौचालये बांधण्याचे ‘टार्गेट’ होते; परंतु त्यापैकी केवळ १८ हजार इतकेच शौचालय पूर्ण होऊ शकले. विशेष म्हणजे मागचे लक्ष्य पूर्ण नसताना शासनाने मात्र, यावर्षी उद्दिष्टांत दीडपट वाढ केली आहे. नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने रोगराई वेगाने फौलावत असून महिलांचीही कुचंबना होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. त्यामुळे घरोघर शौचालये उभारण्यासाठी निर्मल भारत योजना सुरु करण्यात आली. त्याअंतर्गत शौचालय बांधणार्‍या लोकांना शासन प्रोत्साहन म्हणून आर्थिक हातभारही लावत आहे. जिल्ह्यात शौचालयांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, याउपरही ग्रामीण भागात तसेच शहरातील झोपडपट्टी वसाहतींमध्ये उघड्यावर शौचास बसणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे निर्मल भारत, पाणंदमुक्ती यासारख्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याला गतवर्षी ३१ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट्य शासनाकडून आले होते. प्रत्यक्षात केवळ १८ हजार ३८२ शौचालये पूर्ण झाली. उद्दिष्ट्य गाठण्यात अपयशी ठरलेल्या बीडला यावर्षी दीडपट जादा उद्दिष्ट्य आले आहे. त्यामुळे मागील वर्षीचेच टार्गेट अपूर्ण असल्याने यावर्षीचे वाढीव उद्दिष्ट्य पूर्ण होईल का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. २० कोटींहून अधिक निधी जिल्ह्याला चालूवर्षी ४५ हजार शौचालयांचे उद्दिष्ट्य मिळाले आहे. त्यासाठी २० कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त निधीची गरज आहे. जि.प. ने पहिल्या टप्प्यांत १७ कोटींची मागणी नोंदविली आहे. लवकरच निधीही मिळेल, असे पंचायत विभागतील सूत्रांनी सांगितले. ‘टार्गेट’ पूर्ण करु पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी म्हणाले, मागील वर्षीचे टार्गेट पूर्ण झाले नाही; परंतु यावर्षीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत़ योजनेचा लाभ जास्तीतजास्त लोकांपर्र्यंत पोहोचविण्यात येतील़ आवश्यकतेप्रमाणे निधी उपलब्ध करु, असेही त्यांनी सांगितले़(प्रतिनिधी) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाने शौचालय बांधले की लगेचच ४ हजार ६०० रुपये मिळतील. दारिद्र्यरेषेच्या वरील कुटुंबानांही योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी महिला कुटुंबप्रमुख, अपंग, अल्पभूधारक, भूमीहिन, अनुसूचित जाती- जमातीतील कुटुंबांना याचा लाभ मिळविता येईल. त्यांना देखील ४ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. अभिसरण योजनेंतर्गत निर्मल भारत अभियान व रोजगार हमी योजनेच्या निधीतून दहा हजार रुपयांपर्यंतचे शौचालय बांधता येणार आहे. निर्मल भारत योजनेतून ४ हजार ६०० तर रोजगार हमी योजनेतून ५ हजार ४०० रुपये दिले जातील़ सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे़