शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन २० शहर बसेस रद्द

By admin | Updated: May 31, 2014 00:29 IST

नांदेड : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन २० शहर बसेस महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अखेर रद्द झाल्या आहेत़

नांदेड : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन २० शहर बसेस महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अखेर रद्द झाल्या आहेत़ यासंदर्भात एस़ टी़ महामंडळाकडे बोट दाखवित महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे़ शहर बस वाहतुकीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने नांदेड शहराला २० शहर बसेसची मागणी केली होती़ यासंबंधात महानगरपालिकेने दिलेला २ कोटी ४० लाख रूपयांचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम विभागाने मंजूर केला होता़ त्यानंतर जून २०१३ मध्ये या बसेस शहरात धावतील, अशी घोषणाही महापालिकेने केली होती़ मात्र अद्यापपर्यंत या बसेस आल्या नाहीत़ एसटी महामंडळ व महापालिका यांच्यातील समन्वयाअभावी नवीन मंजूर झालेल्या शहर बसेस गमवण्याची वेळ आली़ तीन वर्षांत खिळखिळ्या झालेल्या शहर बसेसवरच आता नांदेडकर समाधान मानावे लागणार आहे़ मंजूर झालेल्या शहर बसेस रद्द झाल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या दैनंदिन प्रवासासाठी चालविण्यात येणार्‍या शहर बसेसची सेवा महापालिका प्रशासन व एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे कोलमडली आहे़ दहा मोठ्या व वीस मिनी बस एसटी महामंडळाकडे आॅक्टोबर २०१० मध्ये हस्तांतरित करण्यात आल्या होत्या़ अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत शहर बसेसची दुरवस्था झाली आहे़ बसेस चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगत एस़ टी़ महामंडळाने त्या भंगारमध्ये जमा केल्या आहेत़ या बसेसचे पार्ट मिळत नसल्याचे तसेच दुरूस्ती करण्यासाठी कुशल कामगार नसल्याचे कारण एस़ टी़ महामंडळ सांगत आहे़ तर महापालिका एस़ टी़ महामंडळाकडे शहर बसेस स्वाधीन केल्याचे सांगत नागरिकांच्या सुविधांपासून अंग काढून घेत आहे़ (प्रतिनिधी) मनपाचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता राजकुमार वानखेडे यांनी सांगितले, शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी यापूर्वी जेएनएनयुआरएम योजनेतून २० मिनी व १० मोठ्या अशा एकूण ३० बसेस मनपाकडे हस्तांतरित केल्या होत्या़ त्यानंतर मनपाने एस़ टी़ महामंडळासोबत करार करून शहर बसेस हस्तांतरित केल्या़ त्यानंतर पुन्हा नवीन २० शहर बसेसची मागणी करण्यात आली़ मात्र एस़ टी़ महामंडळाने या बसेस चालवण्यास असमर्थता दाखवल्याने त्या रद्द केल्या आहेत़