शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ सेवा गोठलेलीच !

By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST

हरी मोकाशे, लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़

हरी मोकाशे,  लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत सेवेद्वारे केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ खाजगी रक्तपेढीतून रक्त पुरवठा होण्याची संख्या मात्र ११ हजार ४०१ पेक्षा जास्त आहे़ जनजागृतीच झाली नसल्याने रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांना अल्प दरात तात्काळ रक्त मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाच्या अंतर्गतच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने गेल्या डिसेंबरपासून जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ अपघात अथवा गंभीर आजारी असलेल्या रुग्णास रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होऊ नये़ तसेच खाजगी रक्तपेढीतून आर्थिक लूट केली जाऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे़ १०४ या टोल फ्री क्रमांकावरुन देण्यात येणारी ही सेवा प्रत्यक्षात राज्यात जानेवारीपासून सुरु झाली आहे़ रुग्णाने अथवा त्यांच्या नातेवाईकाने टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन रुग्णालयाचे नाव, संपूर्ण पत्ता, माहिती असल्यास रक्तगट, रक्त अथवा रक्तघटक यापैकी कशाची आवश्यकता आहे, त्याची माहिती देणे अपेक्षित आहे़ या क्रमांकावर भ्रमणध्वनीवरुन कॉल केल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत रक्तपुरवठा केला जातो़ या सेवेसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणाही उभी करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यासाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ही यंत्रणा असून तेथून ४० किमीपर्यंतच्या रुग्णास रक्त पुरवठा केला जातो़ लातूर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खाजगी चार रक्तपेढ्या आहेत़ जीवन अमृत सेवा योजनेअंतर्गत ५०० रूपयांपर्यंत रक्तपिशवी मिळते़ खाजगी रक्तपेढीत याचा दर जवळपास दुप्पट दर आहे़ ही सेवा सुरु होऊन जवळपास साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला असताना आजपर्यंत केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ त्याच्या तुलनेत खाजगी रक्तपेढ्यांतून ११ हजार ४०१ रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे़ मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेल्या या सेवेची अद्यापही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांमध्ये जनजागृतीच झालेली नसल्याचे दिसून येत आहे़ डॉक्टरांनी रुग्णास रक्ताची आवश्यकता आहे, असे सांगितले असता रुग्णांचे नातेवाईक खाजगी रक्तपेढींकडे धाव घेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे़ परंतु, सामान्यांना योजनेसंदर्भात माहितीच नसल्याने प्रतिसाद मिळत नाही़ मागणीनुसार रक्तपुरवठा करण्यात येत असल्याचे जीवन अमृत सेवेतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जी़ आऱ मुसांडे यांनी सांगितले़ खाजगी डॉक्टरांची अडचण़़़़ ही सेवा आपल्या रुग्णालयातील रुग्णांना देण्यासाठी खाजगी डॉक्टरांना आपल्या दवाखान्याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते़ त्याचबरोबर या सेवेतंर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते़ दवाखान्याची माहिती शासनाकडे सादर होणार असल्याने खाजगी डॉक्टर दुसर्‍यासाठी आपल्या मागे कटकट नको म्हणून तात्काळ रक्ताची गरज आहे़ ते कुठुनही उपलब्ध करावे असे सांगून हात झटकतात़