शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स लेन भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे होते़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद पठाण, जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, रामनारायण काबरा, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, मोहम्मद खॉ पठाण, जीवन घोगरे पाटील, महिला आघाडी शहराध्यक्षा कृष्णा मंगनाळे, डॉ़ शीला कदम, फेरोज खान यांची उपस्थिती होती़ मुंडे म्हणाले, काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचारविनिमय होऊ शकत होता, परंतु अद्यापही तसा प्रस्ताव आला नाही़ त्यामुळे आता राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केली आहे़ त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ भाजपचा दम, काँग्रेसचा खेळ सुरु आहे, हेही विसरता येणार नाही़ निवडणुकीत भाजपा ताकदीने उतरणार आहे़ काँग्रेसचीही अस्तित्वाची लढाई आहे़ सेनाही लढत आहे़ यामध्ये राष्ट्रवादी सर्वच पक्षांना सरस ठरण्यासाठी सक्षम असल्याचेही मुंडे म्हणाले़ तर प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, देशात कमळ, राज्यात कमळ, नांदेडात कमळ असे होर्डिंग्ज शहरात लावण्यात आले आहेत़ वास्तविक भाजपाने देशात चिखल केला आहे़ आता नांदेडातही चिखल करायचा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.