औरंगाबादेत शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळा

By Admin | Updated: July 7, 2015 00:55 IST2015-07-07T00:27:15+5:302015-07-07T00:55:35+5:30

औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

National workshop on Aurangabad Saturday | औरंगाबादेत शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळा

औरंगाबादेत शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळा


औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे दोन सचिव, ८ राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील ३४ शिक्षणाधिकारी सहभागी होणार आहेत.
जालना रोडवरील हॉटेल ‘लेमन ट्री’मध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी केंद्र तसेच विविध राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी हे ९ जुलैपासूनच औरंगाबादेत दाखल होतील. शिवाय या कार्यशाळेत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक तसेच शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे हेदेखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय समितीमध्ये सहभागी असलेले ८ राज्य व मानव संसाधन मंत्रालयाचे सचिव यांच्या या कार्यशाळेत पोषण आहारासंबंधी अंमलात आणल्या जाणाऱ्या नवीन धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीच्या सदस्यांना औरंगाबाद हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकारी सांगत असले तरी, कार्यशाळेच्या निमित्ताने समिती सदस्यांना औरंगाबादलगत अजिंठा, वेरूळ या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे सहज सोपे होईल. या उद्देशाने ही कार्यशाळा औरंगाबादेत ठेवली असावी, असा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कार्यशाळेच्या तीन दिवस अगोदरच जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहारासंबंधीचे अभिलेखे अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिल्या आहेत.
४ शिवाय मानधन वाटप, स्वयंपाकी, मदतनिसांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शालेय परिसर, किचन शेड, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची स्वच्छता, पोषण आहाराचा साठा स्वच्छ ठिकाणी ठेवला जावा, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश, पोषण आहाराचे वाटप स्वच्छ ताटामध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: National workshop on Aurangabad Saturday