शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात १३ लाखांचा गुटखा पकडला

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

नांदेड: १३ लाख रुपये किंमतीचा गुटखासाठा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला़ ही कारवाई मंगळवारी दूपारी ३ वाजेच्या सुमारास मुजामपेठ भागात करण्यात आली़

नांदेड: एका खाजगी ट्रान्सपोर्ट कार्यालयावर धाड टाकून ट्रकमधून उतरवण्यात येणारा १३ लाख रुपये किंमतीचा गुटखासाठा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला़ ही कारवाई मंगळवारी दूपारी ३ वाजेच्या सुमारास मुजामपेठ भागात करण्यात आली़ सदरील गुटखा हैदराबाद येथून आणला असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे़राज्यात गुटखा उत्पादन, साठवणूक व वाहतूकीवर बंदी आहे़ जवळपास अडीच वर्षापासून बंदी असूनही गुटखा विक्री आजही जोमात सुरु आहे़ पाच पट जादा दर आकारून व्यापारी आर्थिक हीत साधत आहेत़ एफडीएच्या पथकाने गत आठ महिन्याच्या कालावधीत चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखासाठा जप्त करण्यात आला़ धाडीत गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केला जात होता़ परंतु गुटखा आणला कोठून याचा तपास मात्र लागत नव्हता़ शहरातील मुजामपेठ भागातील ट्रान्सपोर्टमध्ये गुटखा उतरवण्यात येत असल्याची माहिती एफडीए व पोलिसांना मिळाली होती़ १९ रोजी दुपारी आॅल महाराष्ट्रा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकली़ येथे ट्रक क्रमांक यु़पी़ ९२ बी़ ०७४४ मधून गुटखा उतरवण्यात येत असल्याचे आढळून आले़ सदरील गुटखा हैदराबाद येथून आणल्याची माहिती चौकशीत उघड झाली़ गोवा, सितार, रजनीगंधा हे तीन ब्रँड येथे आढळून आले़ सदरील ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक म़ अजीज इकबाल याचे शहरातील मन्यार गल्ली भागात जनता किराणा दुकान असून येथे विक्री करण्यासाठी हा माल आणल्याचे सांगण्यात आले़ याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़ सदरील कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे, सहायक पोलिस निरीक्षक निकम, राहूल तायडे, कलंदर कांबळे, मोरे आदींनी सहभाग नोंदवला़ शहर व परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट कार्यालये आहेत़ येथून विविध मालाची मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात केली जाते़ गुटख्याचे ट्रान्सपोर्ट कनेक्शन उघड झाल्याने यापुढे गोडाऊनसह मालवाहतूकीवर विशेष लक्ष राहणार आहे़ (प्रतिनिधी)