शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

संगीत खुर्चीचा खेळ संपला

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

अंबड : अंबड पोलीस ठाण्यात सुरु झालेला संगीत खुर्चीचा खेळ अखेर शनिवारी संपला.

अंबड : अंबड पोलीस ठाण्यात सुरु झालेला संगीत खुर्चीचा खेळ अखेर शनिवारी संपला. अहमदनगर जिल्हयातील नेवासा येथुन आलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी ७ जुन रोजी सायंकाळी अंबड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
विशेष म्हणजे आघाव यांनी यापूर्वी काही काळ अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवा केलेली आहे. त्यामुळे तालुक्यात उच्छाद मांडलेल्या वाळू माफियांसह बोकाळलेल्या अवैध धंद्याना चाप लावण्याची अपेक्षा त्यांच्याकडुन व्यक्त होत आहे.
अंबडचे पोलीस निरीक्षक वसंत कांबळे यांची औरंगाबाद जातपडताळणी विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी पदी पदोन्नतीवर बदली झाली. कांबळे यांच्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.
दरम्यानच्या काळात २९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सेवली येथील पोलीस निरीक्षक एस.एस.गायकवाड यांनी अंबड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला.
मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गायकवाड पदभार पुन्हा एकदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना सोपवून सेवली येथे रुजु होण्यासाठी रवाना झाले. एकाच दिवसात पोलीस निरीक्षकाच्या झालेल्या बदलीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र या बदलीविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. अंबड पोलीस ठाण्यात सुरु झालेला हा संगीत खुर्चीचा खेळ अखेर ७ जून रोजी सायंकाळी संपला. अहमदनगर जिल्हयातील नेवासा येथून आलेले पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी अंबड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
सध्या अंबड तालुक्यात वाळु तस्करी, मटका, जुगार, पत्त्यांचे अडडे, रोडरोमियो, अवैध मद्यविक्री, स्वस्त धान्याचा काळाबाजार, अवैध वाहतुक आदी समस्यांनी उच्छाद मांडला असुन पोलीस निरीक्षक आघाव याविषयी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय तालुक्यात गुन्हेगारीचे स्वरूपही वाढले असून त्यावर नियंत्रण बसणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध उघडलेली मोहीम अंबड तालुक्यातही यशस्वी होणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी नवीन पोलिस निरीक्षक या नात्याने आघाव यांच्यावर आली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक आघाव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)