शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचारी १५ पासून संपावर

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैैपासून राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला

हिंगोली : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैैपासून राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली.राज्यातील पालिका कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून १०० टक्के पगार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावा ही प्रमुख मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नगर पालिका कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी तत्काळ देण्यात यावीत आदी मागण्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. दरम्यान, या संघटनेच्या या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने राज्यातील ७० हजार नगर पालिका कर्मचारी तसेच परभणी, लातूर व चंद्रपूर महानगर पालिकेचे कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)