शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेच्या हमला पथकाने दिले ७ प्रभागांत ५४० टँकर्स पाणी

By admin | Updated: February 17, 2016 00:35 IST

लातूर : महापालिकेच्या हमला पथकाने मंगळवारी ७ प्रभागांत तब्बल ५४० टँकर्स पाणी वितरण केले आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेली टँकरच्या पाण्याची ही मोहीम दिवसभर अगदी जोमात होती.

लातूर : महापालिकेच्या हमला पथकाने मंगळवारी ७ प्रभागांत तब्बल ५४० टँकर्स पाणी वितरण केले आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेली टँकरच्या पाण्याची ही मोहीम दिवसभर अगदी जोमात होती. प्रत्येकी दोनशे लिटर्स प्रमाणे पाणी वितरण करण्यात आले असून, कोणाचीही तक्रार शिल्लक नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. महापालिकेने नळयोजनेद्वारे पाणी देण्याचे केलेले नियोजन रद्द करून सोमवारी हमला पथकाद्वारे टँकरने पाणी देण्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार मंगळवारी प्रभाग क्र. १५, १६, १७, २८, २५, ४ व ३२ मध्ये तब्बल ७० टँकर्सच्या माध्यमातून सकाळपासून पाणी वितरण सुरू करण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रदीप ठेंगळ यांनी गांधी चौकात पहिले टँकर भरून संबंधित भागाकडे पाठवून दिले. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी, बांधकाम अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह सर्वच विभागांतील कर्मचारी पाणी वितरणाच्या कामाला लागले. त्यामुळे मनपा कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. परिणामी, इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सध्या पाण्याचा विषय गंभीर असल्याने आहे त्या परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करून तहान भागविण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. खाडगाव रोड, सोना नगर, चौधरी नगर, विकास नगर, सम्राट चौक, जाफर नगर, रेणापूर नाका आदी परिसरात दिवसभर टँकरचे पाणी वाटप केले होते. कर्मचारी तसेच नगरसेवकही पाणी वाटपाच्या कामात व्यस्त होते. रात्री ९ वाजेपर्यंतही पाणी वाटपाचे काम सुरुच होते. या भागात आता पाच दिवसांनंतर टँकर येणार आहे. त्यामुळे जेवढे पाणी मिळाले, तेवढ्यावर आता पाच दिवस काढावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)