शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंच्या समावेशाचे उत्स्फूर्त स्वागत

By admin | Updated: May 27, 2014 00:55 IST

बीड : जिल्ह्याचे भूमिपुत्र व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्री म्हणून सोमवारी वर्णी लागली

बीड : जिल्ह्याचे भूमिपुत्र व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्री म्हणून सोमवारी वर्णी लागली. जिल्ह्याला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्हावासियांचा उर भरून आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दणाणून गेला. बीडमध्ये आनंदोत्सव खा. गोपीनाथ मुंडे नामदार झाल्यानंतर बीडमध्ये भाजप- सेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पेठबीड भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी भाजयुमोचे राज्य कोषाध्यक्ष भगीरथ बियाणी, महावीर कोठारी, गोपाल पारीख, शेख फारूक, अज्जू जहागीरदार, दत्ता परळकर, पवन लोहट, भैय्या पांढरे आदी उपस्थित होते. माजलगावात रॅली माजलगाव शहरात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा शपथविधी सुरू असताना ठिकठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढ्यांचेही वाटप करण्यात आले. शहरातून निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी अरुण राऊत, मनोज जगताप, ईश्वर खुर्पे, भाई गंगाभिषण थावरे, रफिक तांबोळी, बबन सिरसट, मनोज फरके, तुकाराम येवले, सूर्यकांत दराडे, ज्ञानेश्वर मेंडके, कमल बजाज, दीपक मेंडके उपस्थित होते. परळीत जल्लोष खा. गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असलेल्या परळीमध्ये नागरिकांनी एकच जल्लोष केला. मुंडेंच्या नाथरा या गावीही कार्यकर्त्यांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. परळीमध्ये शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहीया, शांतीलाल जैन, विकासराव डुबे, माऊली फड, सुरेश गिरडे, राजेंद्र ओझा, महादेवअप्पा इटके, उमेश खाडे, नरेश पिंपळे, प्रदीप कुलकर्णी, नितीन समशेटे, राजेंद्र लोढा, शेख फतरू यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रॅली काढली. परळीतील अनेकांनी मुंडेंचा शपथविधी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिल्ली गाठली. भूमिपुत्र देशाचा मंत्री झाल्यामुळे परळीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गेवराईत आतषबाजी गेवराईमध्ये अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या निवडीचे जोरदार स्वागत केले. शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी व गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. आष्टी तालुक्यात पेढ्यांचे वाटप आष्टी, कडा, करेवाडी येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला. भाजयुमो जिल्हा सरचिटणीस राम खाडे, सरपंच सोपान सांगळे, दादासाहेब राऊत, संजय गुंड, ज्ञानेश्वर थोरवे, तात्यासाहेब जेधे, हनुमंत सांगळे, जालिंदर नागरगोजे, राजेश कराड, बाळासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधींकडून)