शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा!

By admin | Updated: October 30, 2014 00:31 IST

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते. वेळ आणि पैसा जास्त जात असल्याने एमटीडीसीने मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाचे चर्चाही सुरू केली आहे.दरमहा दीड हजारहून अधिक विदेशी पर्यटक अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येतात. बहुतांश पर्यटक मुंबईहून विमानाद्वारे किंवा रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. औरंगाबादहून १०९ कि.मी. वाहनाने प्रवास करून त्यांना अजिंठा येथे पोहोचावे लागते. काही विदेशी पर्यटकांना ही प्रक्रिया खूपच कठीण आणि क्लिष्ट वाटते. मुंबईहून थेट अजिंठा लेण्यापर्यंत किमान हेलिकॉप्टर सेवा असावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.यापूर्वी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद ते शिर्डी आणि अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासंदर्भात विचारविमर्श केला होता. मात्र, ही योजना प्रत्यक्षात अमलात आली नव्हती. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयाने यासंदर्भात पुन्हा एकदा पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.अजिंठा येथे एमटीडीसीच्या जागेवर हेलिपॅड बांधण्यात आलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून या हेलिपॅडचा वापरच होत नाही. मुंबईहून हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एमटीडीसी प्रशासनाला आहे. या सेवेतून एमटीडीसीला काही उत्पन्न मिळेल. कारण हेलिपॅड एमटीडीसीच्या जागेवर आहे. विमानाने मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी किमान पाच हजार रुपये आणि औरंगाबाहून टॅक्सीद्वारे अजिंठा येथे जाण्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो. मुंबईहून रेल्वेने पर्यटक आले तरी किमान ७०० ते ८०० रुपये लागतात. खर्चाचा सर्व हिशेब गृहीत धरून मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवेचे भाडेही पर्यटकांना परवडेल असेच ठेवण्याचा मानस एमटीडीसीने व्यक्त केला आहे.