मुक्ताई पालखी आज शहरात

By Admin | Updated: June 19, 2014 00:23 IST2014-06-19T00:12:40+5:302014-06-19T00:23:27+5:30

जालना : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईची दिंडी गुरूवारी सायंकाळी शहरात दाखल होणार आहे.

Muktai Palkhi in the city today | मुक्ताई पालखी आज शहरात

मुक्ताई पालखी आज शहरात

जालना : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईची दिंडी गुरूवारी सायंकाळी शहरात दाखल होणार आहे.
५ जून रोजी ही दिंडी मुक्ताईनगर येथून निघाली. २०७ वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीत एक हजारावर वारकरी सहभागी आहेत. सुमारे ३४ दिवसांचा प्रवास करून ही दिंडी पंढरपूरात दाखल होणार आहे.
१९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही दिंडी कन्हैय्यानगरमध्ये दाखल होणार आहे. या ठिकाणी मुक्काम, २० जून रोजी सकाळी पांजरा पोळ गोरक्षण ट्रस्ट येथे भोजनासाठी विसावणार आहे. तेथून हॉटेल सूर्या, सिंधी बाजार, सुभाष रोड, मामा चौक, महावीर चौक, जुना मोंढा, मस्तगड, शनि मंदिरमार्गे काजळा फाटा येथील वृद्धाश्रमात मुक्कामी असणार आहे.
२१ जून रोजी अंबड, २२ रोजी वडीगोद्री, २३ रोजी पाथरवाला येथून ही दिंडी बीडमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, व्यवस्थापक हरणे, सुधाकर पाटील, मुरलीधर सांबरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Muktai Palkhi in the city today