शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा विजय माध्यमांमुळे नाही

By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST

अहमदनगर : मोदींचा विजय माध्यमांमुळे झाल्याचे विश्लेषण केले जाते. मात्र, तो केवळ भ्रम आहे.

अहमदनगर : मोदींचा विजय माध्यमांमुळे झाल्याचे विश्लेषण केले जाते. मात्र, तो केवळ भ्रम आहे. माध्यमांमुळे लोक मत बनवत नाहीत. माध्यमे केवळ पार्श्वभूमी तयार करण्यासाठी साह्यभूत ठरतात, असे मत माध्यम तज्ज्ञ प्रा. जयदेव डोळे यांनी मांडले.न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या भाषाविषयक कार्यशाळेत जनमत आणि प्रसारमाध्यमे आणि त्याची भाषा या विषयावर ते बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जाहिराती केल्याच होत्या. मग त्यांना का नाही यश आले. तमीळनाडू, पूर्वांचल, प.बंगालमध्येही मोदी का चालले नाही. ही उदाहरणेही त्यासाठी पुरेशी आहेत, असे विश्लेषणही डोळे यांनी केले. प्रसारमाध्यमे ही फुंकणीचे काम करतात. त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. ते जनता आणि नेता यांच्यातील पूल आहे, असे सांगून डोळे म्हणाले की, पत्रकार कधीच नेता घडवू शकत नाही, तसे असते तर चौकाचौकात फ्लेक लावून आणि जाहिराती देऊन नेतृत्व निर्माण झाले असते.एकवेळ बोलका नेता लवकर यशस्वी होऊ शकतो. कारण त्याला लोकांची नाळ संवाद साधल्याशिवाय समजणार नाही. वर्तमानपत्र वाचून समाजपरिवर्तन होत नाही. तसे असते तर समाजसुधारकांनी केवळ त्याव्दारेच ते घडवून आणले असते. पण तसे घडत नाही. टाटा, अंबानी, किर्लोस्कर यांनीही जनमत तयार करण्यासाठी वर्तमानपत्र काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती चालली नाहीत. जनमत घडविण्यासाठी सुरू केलेली पत्र लोकांना माहितीही नसतात, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)पत्रकारांचे वाचन थांबलेपत्रकारांची साहित्यापासून नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे त्यांना शब्दांचा भावार्थ कळत नाही. वाक् प्रचार, म्हणी अनावश्यक वापरल्या जातात. सध्याची भाषा नीरस बनली आहे. एकाच परिच्छेदात शब्दाची पुनरावृत्ती असते. पुनरावृत्तीही टाळली जात नाही़‘संपन्न’, ‘सतर्क’ हे हिंदी तसेच इंग्रजी शब्दही चुकीच्या अर्थाने वापरले जात आहेत. नवीन शब्द तयार केले जात नाहीत. हे टाळण्यासाठी साहित्य वाचले पाहिजे, असेही जयदेव डोळे यांनी सांगितले़मोदी भाजपाचे बँ्रडभाजपाचे मोदी नावाचे ब्रँड निवडणूक बाजारात चांगले चालले. आपले मार्केटिंग कसे करावे, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करावा हे मोदींना ठाऊक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा, संसदेच्या पाया पडून इव्हेंट बनवतात. मात्र, राजकारणात अशा प्रकारची ब्रँडविक्री फार दिवस चालत नाही,असेही डोळे म्हणाले.