शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मास्तरांचा तास; विद्यार्थ्यांना कुतूहल

By admin | Updated: September 6, 2014 00:42 IST

औरंगाबाद : मोदी मास्तरांनी भरविलेल्या शाळेचे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण आणि कुतूहलही होते

औरंगाबाद : मोदी मास्तरांनी भरविलेल्या देशस्तरीय शाळेचे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण आणि कुतूहलही होते; परंतु शाळांकडे सभागृहाची वानवा, सदोष दूरचित्रवाणी व लाऊड स्पीकर यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह मावळला. पंतप्रधानांनी त्यांच्याशी साधलेला संवाद त्यांना ना कळला, ना उमजला...‘सक्ती असावी की नसावी’ यावरून उडालेल्या गदारोळामुळे अगोदरच चर्चेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्तरांच्या शाळेविषयी शुक्रवारी प्रचंड उत्सुकता दिसून आली. बहुतांश शाळांनी आजचे स्वंयशासन दिनाचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे दुपारनंतर मुले शाळेत आली. मोदी काय बोलणार याविषयी त्यांच्यात कुतूहल होते. मोदी यांनी दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष संवादास सुरुवात केली. तेव्हा मुलांचे कान टवकारले होते. मोदींनी बोलण्यास सुरुवात करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मोदी एखादा प्रश्न दूरचित्रवाणीवरून विचारताच, येथे दूरचित्रवाणीसमोर बसलेली मुले उत्तर देण्यासाठी उत्स्फूर्त हात वर करताना दिसत होती. काही विद्यार्थी मोदी गुरुजी जे सांगत होते, ते वहीवर टिपून घेत होते. आवडलेल्या संवादावर टाळ्या पडत होत्या. अडचणी अनंत५० विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या क्षमतेपेक्षा मोठ्या वर्ग खोल्या अनेक शाळांमध्ये नाहीत. त्यामुळे जागा मिळेल तशा अवस्थेत मुलांना बसविण्यात आले होते. काही शाळांनी थेट मैदानात विद्यार्थ्यांना बसवून फक्त त्यांना भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. लहान दूरचित्रवाणी संचावरून मोदी विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसत नव्हते, तर सदोष स्पीकरमुळे ते काय बोलतात, हे स्पष्ट ऐकूही येत नव्हते. त्यामुळे चिमुरड्यांना हे पावणेदोन तास कंटाळवाणे झाले. गुजराती कन्या प्रशालने मात्र विद्यार्थिनींना बसण्यासाठी खास मंगल कार्यालयात व्यवस्था केली होती. एलसीडी प्रोजेक्टरवरून मोदींचा संवाद प्रक्षेपित करण्यात आला; परंतु या भागात चार वाजेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे विद्यार्थिनींचा हिरमोड झाला. या दोन तासांदरम्यान शहरात काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. घरोघरी भरली शाळाशहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळातून मोदी संवादाच्या कार्यक्रमाला थंड प्रतिसाद मिळाला. अनेक शाळांनी कोणतीही व्यवस्था केली नव्हती . त्यामुळे ही मुले घरी बसून दूरचित्रवाणी संचावरून मोदी गुरुजींच्या शाळेत सहभागी झाले. ग्रामीण भागातील अनेक शाळांतून दूरचित्रवाणी संच नसल्यामुळे एखाद्या विशिष्ट घरी शाळा भरविण्यात आल्या. धामणगाव जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावातील नागरिक बशीर पटेल यांच्या निवासस्थानी शाळा भरविली.