शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

औरंगाबादेत ७ लाख कॉल ट्रान्झॅक्शन्सला मोबाईल नेटवर्क जामचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 3:22 PM

कारवाई न झालेल्या उर्वरित टॉवरवर मोबाईल नेटवर्कचा भार 

ठळक मुद्देकारवाईत २०० टॉवर सील केल्याने ग्राहकांना फटका ३२ कोटींहून अधिकची थकबाकी मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या अनधिकृत मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे मोबाईल नेटवर्क जाम होत असून, ‘कॉल ड्रॉप’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या एक दिवस बिल भरण्यास अथवा रिचार्ज करण्यास विलंब झाला, तर फोनचा संवाद आणि इंटरनेट सेवा बंद करतात; परंतु तीन दिवसांपासून ग्राहकांना सेवा सुरळीत मिळत नसल्यामुळे कंपन्या त्याची कशी भरपाई करणार, असा प्रश्न आहे. 

३२ कोटींहून अधिकची थकबाकी मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे आहे. ती थकबाकी मिळण्यासाठी मनपाने टॉवर्स सील करण्याची कारवाई सुरू केली असून, सुमारे ७ लाख कॉल ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच फोन करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. महापालिका हद्दीत ५९५ मोबाईल टॉवर्स आहेत. त्यातील २०० च्या आसपास टॉवर्स मनपाने थकबाकीपोटी सील केले आहेत. परिणामी टॉवर्सच्या बॅटरीज, जनरेटरमधील इंधन संपले असून, ते भरण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा नियुक्त केली आहे. त्यांना काहीही करता येत नसल्याने टॉवर बंद आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना मिळणारे नेटवर्क कनेक्शन ठप्प पडले आहे. इंटरनेट आणि संवाद सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत बीएसएनएल अथवा इतर कोणत्याही कंपनीच्या स्थानिक अथवा झोन व्यवस्थापकांनी कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. 

कॉल ड्रॉपची माहिती घ्यावी लागेलशहरात मोबाईल टॉवर सील झाल्यामुळे किती मोबाईलधारक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे, याची माहिती घ्यावी लागेल. बीएसएनएलचे सर्व टॉवर्स अधिकृत आहेत. इतर कंपन्यांच्या टॉवर्सवरून किती ग्राहकांना सेवा मिळते, याची माहिती घ्यावी लागेल. राजेंद्र गांधी, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल 

तांत्रिक माहिती अशी : बीएसएनएलच्या तांत्रिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका टॉवरवरून दिवसातून टूजी, थ्रीजीचे ३ ते साडेतीन हजार कॉल ट्रान्झिट होतात. म्हणजेच फोन केले जातात. एक व्यक्ती दिवसातून अनेकदा फोन करते. त्यानुसार ही सरासरी असते; परंतु त्याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. बॅटरी आणि जनरेटरमधील इंधन संपल्यास टॉवर बंद पडते. ते सील केल्यामुळे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टॉवरच्या आत जाता येत नाही. परिणामी टॉवर बंद पडते. टॉवर बंद पडले की, नेटवर्क बंद पडते. त्यामुळे मोबाईलधारकांना इंटरनेट आणि कॉल सुविधा मिळत नाही. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा  आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई होण्यापूर्वी कंपन्यांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी टॉवर्सकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०० टॉवर जर सील झाले असतील, तर त्याचा परिणाम ७ ते ८ लाख कॉल ट्रान्झिकशन्सवर झाला असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाईल कंपन्या     टॉवर्सची संख्या रिलायन्स जिओ    १६१इंडस टॉवर    ९८बीएसएनएल    ५१व्होडाफोन    २८टाटा    ३५आयडिया    ३१एटीसी    ६१एअरटेल    ६०इतर    ७०एकूण     ५९५

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेटAurangabadऔरंगाबादTaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका