शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मनसे अजूनही संभ्रमातच !

By admin | Updated: September 10, 2014 00:48 IST

प्रताप नलावडे , बीड विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी बीड जिल्ह्यात मनसे अजूनही संभ्रमातच असल्याचे दिसत आहे.

प्रताप नलावडे , बीडविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी बीड जिल्ह्यात मनसे अजूनही संभ्रमातच असल्याचे दिसत आहे. वरून काही निरोप नाही आणि नेमके काय करावे, हे समजत नाही, असे अतिशय हाताश होत कार्यकर्ते एकमेकांना सांगू लागले आहेत.बीड जिल्ह्यात मनसेने दीड महिन्यापूर्वी परळी वगळता सर्व जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात स्वत: माहिती दिली होती. त्यादृष्टीने कार्यकर्ते कामालाही लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले असून लवकरच त्यांची बीडमध्ये जाहीर सभा होईल, असेही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी दीड महिन्यांपासून राज ठाकरे यांची सभा कधी होणार, याचीच प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे. गेवराई आणि माजलगाव या दोन मतदारसंघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्या असल्यातरी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आहे आणि तयारीला कोणी लागायचे याचे आदेश अजूनही आलेले नसल्याचे कार्यकर्तेच सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मनसेची भूमिका गुलदस्त्यातच राहिली होती. उमेदवार देणार असे सांगत असतानाच ऐनवेळी मनसेने आपला उमेदवार दिला नाही. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र देत भाजपाला उघडपणे पाठिंबा दिला होता.विधानसभा निवडणुकीतही नेमके पक्षीय पातळीवर काय भूमिका असेल, याबद्दल कार्यकर्तेच सांशक आहेत. एका पदाधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याची विनंती करीत सांगितले, पक्षीय पातळीवरून दीड महिन्यापूर्वी संपर्क झाला होता. त्यानंतर आजवर कोणीही संपर्क केलेला नाही. कोणत्या जागा लढायच्या आहेत, हेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे परळी वगळता पाच मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आहेत की नाही, याचीच आमच्या मनात शंका आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोशही कमी होऊ लागला आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांना यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, संभ्रम वगैरे काही नाही. आम्ही आमच्या पातळीवर तयारी केली आहे आणि आमच्या नेत्यांशीही आमचे बोलणे होत आहे. औरंगाबादला राज ठाकरे येणार आहेत. त्यावेळी ते जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. आमचे कार्यकर्ते जिल्ह्यात जोमाने कामाला लागले आहेत.