शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला युतीसाठी सर्व पर्याय खुले

By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करू शकतो. काही पक्षांसोबत आमची बोलणीही सुरू आहेत, असे आज मनसेचे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करू शकतो. काही पक्षांसोबत आमची बोलणीही सुरू आहेत, असे आज मनसेचे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने ते आज येथे आले होते.यावेळी नांदगावकर म्हणाले की, मनसेची जनसुराज्य पक्ष, शेकाप यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात नवे समिकरण आकारास येऊ शकते. शिवसेनेवर छगन भुजबळ यांनी जहरी टीका केली, याउपरही भुजबळ ‘मातोश्री’वर जाऊन आले, असे सांगतानाच मनसेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचेही सूचक विधान त्यांनी यावेळी केले.मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दौरा त्यांनी ६ ते १० जुलै दरम्यान केला. लातूरमध्ये निलंगा, उदगीर, अहमदपूर, उस्मानाबादमध्ये भूम-परांडा, उमरगा-लाहोरा तर बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव व बीड विधानसभा मतदारसंघ मनसेसाठी सोयीचे असल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागात राज ठाकरे यांची सभा घ्यावी, अशी सर्वत्र मागणी असल्याचे सांगतानाच आगामी काळात मनसे कोणाशीही जुळवून घेऊ शकते, याची शक्यताही त्यांनी वर्तविली. पत्रपरिषदेस माजी आ. सुनील धांडे, जिल्हाध्यक्ष डॉ. भागवत सानप, रेखा फड, शैलेश जाधव उपस्थित होते़बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजीपत्रपरिषदेपूर्वी आ. नांदगावकर यांनी बीडमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आंदोलनाच्या वेळी अटक झालेल्या कार्यकर्त्यांना मनसेचे वरिष्ठ नेते मदत करीत नसल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी, ‘होते असे कधी-कधी’ असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)ब्लू प्रिंट मध्ये सहा मुद्देपाणी, आरोग्य, रस्ते, वीज, कायदा व सुव्यवस्था या सहा मुद्यावर आधारित व लोकांचे प्रश्न व त्यांना सोडविण्यासाठी उत्तरांसह असलेले ‘ब्लू प्रिंट’ लवकरच जाहीर करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच आमची सत्ता येणार हे सांगताना ते म्हणाले की, हे वक्तव्य ‘ओव्हर’ नाही तर ‘मोअर’ आहे, असे म्हणत बीडची उमेदवारी माजी आ. सुनील धांडे यांना देण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले़