शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेमध्येच स्वबळाची ताकद

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या कोणत्याही पक्षात नाही़

नांदेड : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या कोणत्याही पक्षात नाही़ दरम्यान, ही ताकद असणारी एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणूक २८८ जागांवर स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे गटनेते आ़ बाळा नांदगावकर यांनी आज येथे दिली़ शनिवारी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या़ यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, संपर्क प्रमुख उदय सामंत, माजी आ़ रोहिदास चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार, विनोद पावडे, अ‍ॅड़ दिलीप ठाकूर, मॉन्टीसिंग जहागिरदार, अजय सरसर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही़ परंतु आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोक आम्हाला पसंती देतील, असा विश्वास आ़नांदगावकर यांनी व्यक्त केला़ लातूरपासून मराठवाडा दौऱ्यास सुरूवात झाली आहे़ दौऱ्यामध्ये निवडणूक तयारी, पक्ष संघटन स्थिती आणि उमेदवार चाचपणी सुरू असून हा सर्व अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले़ नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मनसेला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ मुखेड, बिलोली, कंधार, लोहा तालुक्यात मनसेने आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे़ आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता लोहा - कंधार मतदारसंघासाठी पाच, नांदेड उत्तरकरीता चार आणि नांदेड दक्षिण मतदारसंघाकरीता आठ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून येत्या काही दिवसामध्ये उमेदवारांची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले़ मनसेच्या ब्ल्यू प्रिंटवर वारंवार टीका होत आली आहे़ मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा ब्ल्यू प्रिंट घेवून आम्ही येणार आहोत, असे आ़नांदगावकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)