शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

टिकून राहण्याचे मनसेपुढे आव्हान?

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत पक्षाची निष्प्रभ कामगिरी झाल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून टिकून राहण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. महापलिकेच्या एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी करण्याच्या हेतूने राज ठाकरे यांचा दौरा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तिला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र, त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. जिल्ह्यात सर्व नऊ मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आणि त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे कार्यकर्तेही सैरभैर आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मनसेचे अनेक कार्यकर्ते मात्र पक्षातच टिकून आहेत. कदाचित महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गळती लागू शकते त्या दृष्टीनेही राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष तयारी करणार असला, तरी शहरात असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांत पक्षाची कामगिरी अगदीच सामान्य राहिली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात नगरसेवक असलेले राजवैभव वानखेडे यांना सुमारे पाच हजारांवर इतकी मते मिळाली. पूर्व मतदारसंघातील उमेदवार आणि शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांना तसेच पश्चिम या राखीव मतदारसंघात गौतम आमराव यांना दोन हजारांच्या आत मते मिळाली. खरे तर या तिन्ही मतदारसंघांत मनसेचे उमेदवार तुल्यबळ नव्हते, तरीही मनसेने एक परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, असे दिसते. २०१० च्या महापालिका निवडणुकीत एकच नगरसेवक निवडून आला. त्यानंतर मागील पाच वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांनी विविध आंदोलने छेडून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. महापालिकेच्या विरोधात तर पक्षाने रान उठविल्याचे चित्र दिसले. शैक्षणिक क्षेत्रात तसेच महिलांची अनेक आंदोलने झाली. मात्र, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्या गदारोळात ती विरून गेली. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. राज ठाकरे नव्याने चैतन्य निर्माण करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे कोणता नवा मंत्र देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे.