शिक्षिका आत्महत्या प्रकरण; चौघांवर गुन्हा

By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:19:16+5:302015-04-17T00:43:35+5:30

बीड : शहरातील शाहूनगर भागात बुधवारी शिक्षिकेने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर शिवाजीनगर ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mistress Suicide Case; Crime against four | शिक्षिका आत्महत्या प्रकरण; चौघांवर गुन्हा

शिक्षिका आत्महत्या प्रकरण; चौघांवर गुन्हा

बीड : शहरातील शाहूनगर भागात बुधवारी शिक्षिकेने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर शिवाजीनगर ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता लक्ष्मण वारे (वय २५, रा. शाहूनगर, बीड) असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. त्यांना सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जायचा त्यामुळे त्यांनी बुधवारी गळफास घेतला असा आरोप माहेरच्या लोकांनी केला. उमाजी नाथराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन दत्ता लक्ष्मण वारे, सरस्वती वारे, लक्ष्मण वारे व दिगंबर वारे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mistress Suicide Case; Crime against four