अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य
By Admin | Updated: August 14, 2014 01:54 IST2014-08-14T01:52:13+5:302014-08-14T01:54:35+5:30
उस्मानाबाद : किराणा दुकानामध्ये चॉकलेट घेण्यासाठी आलेल्या लहान मुलीला मोबाईलवरून अश्लील चित्रे दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य
उस्मानाबाद : किराणा दुकानामध्ये चॉकलेट घेण्यासाठी आलेल्या लहान मुलीला मोबाईलवरून अश्लील चित्रे दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार केशेगाव येथे १२ आॅगस्ट रोजी घडला. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केशेगाव येथे अमोल भास्कर पाटील याचे किराणा दुकान आहे. मंगळवारी दुपारी या दुकानामध्ये एक लहान मुलगी चॉकलेट घेण्यासाठी आली असता अमोल भास्कर पाटील याने तिला आपल्या मोबाईलवरून अश्लील चित्रे दाखविली. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील वर्तनही केले, असे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
त्यावरून अमोल भास्कर पाटील याच्याविरूद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३७७, ५०६ आणि ४, ६ बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दंडे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)