शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी मंत्रालया’चा चेहरामोहरा बदलणार !

By admin | Updated: May 24, 2014 01:33 IST

बीड : जिल्हा परिषदेची आताची इमारत अतिशय दयनीय झाली आहे़ त्यामुळे नूतन इमारतीचा प्रस्ताव ठेवला होता़ त्याला ग्रामविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे़

बीड : जिल्हा परिषदेची आताची इमारत अतिशय दयनीय झाली आहे़ त्यामुळे नूतन इमारतीचा प्रस्ताव ठेवला होता़ त्याला ग्रामविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे़ तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेच्या आवारात देखणी इमारत उभारण्यात येणार आहे़ नवी इमारत परभणी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे ‘डिक्टो मॉडेल’ असणार आहे़ मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची आताची इमारत ५४ वर्षांपूर्वीची आहे़ ही इमारत आता जीर्ण झाली असून तेथे काम करताना अधिकारी, कर्मचार्‍यांना जीव मुठीत धरून बसावे लागते. इमारत डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही इमारत धोक्याची बनली आहे. औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी जि.प. इमारत धोक्याची असल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच दिलेला आहे. त्यानंतर २३ जानेवारी २०११ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नूतन इमारतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला मंजुरीही मिळाली. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला. या विभागाने या प्रस्तावापुढे मंजुरीची मोहर उमटविली. नुतन इमारत ७ हजार २३६.४८ चौ.मि. क्षेत्रावर साकारण्यात येईल. या इमारतीत अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. इमारत चौमजली असून सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. महत्वाचे म्हणजे इमारतीचे काम तीन वर्षात पूर्ण करावयाचे आहे. पहिल्या टप्प्यात १८ कोटी रुपये जि.प.ला प्राप्त झाले आहेत. जि.प. इमारत पूर्ण होण्यासाठी नगररचनाकार प्राधिकरणची परवानगी घ्यावी लागणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये नुकतीच जि.प. इमारत बांधण्यात आली आहे. त्याचे मॉडेल बीडमध्ये घेण्यात येईल. दर्जेदार काम करू न घेणार जि.प.चे सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, जिल्हा परिषदेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. बांधकाम दर्जेदार करण्यात येणार असून नूतन इमारतीत जास्तीत जास्त सुविधा राहणार आहेत. ३४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पैकी १८ कोटी आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये अग्निशमन विभागाची सोय करण्यात आली आहे. इमारतीच्या भोवताली बगिचा तयार करण्यात येईल. पार्र्कींगसाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या शिवाय लिफ्टची सोय करण्यात आली आहे. जि.प.चे सर्व विभाग या इमारतीत बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. सीईओ, जि.प. अध्यक्ष, सभापती व विभाग प्रमुख यांच्या कक्षांचे रूपडेही पालटणार आहे. अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवीन इमारतीतील विद्युतीकरणासाठी २७ लाख रुपये, पाणीपुरवठ्यासाठी ९२ लाख ८२ हजार, रेन वॉटर व्हार्वेस्टींग २३ लाख ३० हजार , अंतर्गत रस्ते २५ लाख, अद्ययावत फर्नीचर १ कोटी ८० लाख ९२ हजार, बगिचा २५ लाख लिफ्ट २०, लाख अग्नीशमन ५८ लाख १ हजार ६९ इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.