शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद 'मध्य'मधून एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात; इम्तियाज जलील कोठून लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 15:40 IST

औरंगाबाद-मध्य मतदारसंघात २०१४ सारखी चौरंगी लढत होण्याचे संकेत

छत्रपती संभाजीनगर: शहरातील औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. येथून दोन्ही सेना आणि वंचितने उमेदवार आधीच जाहीर केला होता. आज येथून एमआयएमने महापालिकेतील माजी गट नेते नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात नासेर सिद्दिकी यांनी दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ३५. ४ टक्के मते घेतली होती. यामुळे आता मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील याच मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून २०१९ चे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनाच मैदानात उतरविण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१९ मध्ये नासेर सिद्दिकी दुसऱ्या क्रमांकावर
२०१९ च्या विधानसभेच्या राजकीय आखाड्यात वंचित मुळे मोठा उलटफेर दिसला. या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे ४२.६ टक्के मते घेत विजयी झाले. मात्र, दोन क्रमांकावर 'एमआयएम'चे नासेर सिद्दीकी होते. त्यांनी तब्बल ३५.४ टक्के मते घेतली होती. वंचितचे उमेदवार अमित भुईगळ यांनी तिसऱ्या क्रमांकाची १४.१ टक्के मते घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कदीर मौलाना यांनी ३.८ टक्के मते घेतली होती.

माजी खासदार इम्तियाज जलील कोठून लढणार
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. पक्षाने आता 'मध्य' मधून नासेर सिद्दिकी यांना उमेदवार जाहीर केल्याने जलील यांच्यासाठी औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर हे मतदारसंघ राहतात. आता जलील त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये कोणाला किती मते
पक्ष-------उमेदवार-- -मिळालेली मते- -- --टक्केवारी

एमआयएम- इम्तियाज जलील----६१,८४३-------३२.८
शिवसेना---प्रदीप जैस्वाल----४१,८६१--------२२.२
भाजप--किशनचंद तनवाणी-----४०,७७०----२१.६
राष्ट्रवादी काँग्रेस- विनोद पाटील---११,८४२-----०६.३
बहुजन समाज पार्टी-संजय जगताप---११,०४८----५.९
मनसे---- राज वानखेडे-----६.२९१------३.३
काँग्रेस----एम. एम. शेख-----९,०९३-----४.८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यImtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन