उद्योजकांच्या बैठकीत सुरक्षेवर झाली चर्चा

By Admin | Updated: May 26, 2014 00:57 IST2014-05-26T00:39:39+5:302014-05-26T00:57:03+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक शनिवारी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

In the meetings of the entrepreneurs, security was discussed | उद्योजकांच्या बैठकीत सुरक्षेवर झाली चर्चा

उद्योजकांच्या बैठकीत सुरक्षेवर झाली चर्चा

हिंगोली : जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक शनिवारी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. लिंबाळा एमआयडीसीमध्ये सुरक्षेच्या प्रश्नावर या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. बैैठकीस उद्योजक ज्ञानेश्वर मामडे, प्रकास सोनी, प्रवीण सोनी यांच्यासह उद्योजक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रत्येक कारखानदार, उद्योजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अधिकृत एजन्सीकडून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, त्यांची चारित्र्य पडताळणी करून पोलिस यंत्रणेला त्या बाबत माहिती कळवावी आदी सूचना पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी दिल्या. हिंगोली हा अविकसित जिल्हा असल्याने वर्षातून किमान दोन वेळा उद्योजक मेळावा आयोजित करून बेरोजगारांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसीमध्ये स्वतंत्र पोलिस चौकीत कर्मचारी हजर राहत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली. त्यावर २०११ मध्ये या चौकीसाठी १ फौजदार दर्जाचा अधिकारी व ६ कर्मचारी मंजूर करण्यात आले असून लवकरच त्या ठिकाणी कायमस्वरुपी पोलिस कर्मचार्‍यांची नेमणुक केली जाणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. या शिवाय सध्या एमआयडीसीच्या जागेत असलेल्या या पोलिस चौकीसाठी २० गुंठे स्वतंत्र जागा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत चौकीचे कामकाज गतीशिल केले जाणार आहे. त्या ठिकाणी दूरध्वनी व बिनतारी यंत्रणासंचही बसविला जाणार आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यास दोन वाहने देण्यात आली असून त्यातील एक जीप मोबाईल पेट्रोलिंगसाठी एमआयडीसी भागात वापरली जाणार असल्याचे दाभाडे म्हणाले. लिंबाळा भागात बाजाराच्या दिवशी होणारी दारुविक्री बंद करण्याच्या मागणीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे दाभाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: In the meetings of the entrepreneurs, security was discussed