शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यावर

By admin | Updated: June 14, 2016 00:07 IST

अंकुश वाघ , आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत

अंकुश वाघ , आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर तब्बल ७० गावांचा भार आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी येथे मुख्य डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. येथील प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सूर्यवंशी कार्यरत आहेत. सध्या या केंद्रात २ आरोग्य सहायक पुरुष, १ आरोग्य सहायक महिला, ६ आरोग्यसेविका, १ आरोग्यसेवक, १ कनिष्ठ सहायक, औषधनिर्माण अधिकारी, ४ परिचर ही पदे भरलेली असली तरी ४ आरोग्यसेवक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ वाहनचालक ही पदे रिक्त आहेत. या केंद्राला आडूळ खु., गेवराई बु., एकतुनी, आंतरवाली खांडी, कडेठाण खु. अशी पाच उपकेंद्रे संलग्न आहेत. परिसरातील जवळपास ७० गावांतील रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसूती व कुटुंबकल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी येथे येतात; परंतु येथे रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने नाइलाजास्तव रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करीत उपचारासाठी औरंगाबाद गाठावे लागते. काही दिवसांपूर्वी एकतुनी येथील एका महिलेची वैद्यकीय उपचार लवकर न मिळाल्याने उपचाराअभावी शौचालयात प्रसूती झाली होती. १५ ते १६ हजार लोकसंख्या असलेल्या या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने त्यांची दमछाक होत आहे. मात्र, तरीही आरोग्य विभाग येथील रिक्त पदे भरण्यासाठी कोणतीही हलचाल करताना दिसून येत नाही.