शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील बळावर मतांचे गणित

By admin | Updated: October 6, 2014 00:43 IST

विकास राऊत, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे व इतर सर्व पक्ष मैदानात उतरले असून, सर्वांची ताकद महापालिकेतील पक्षीय बलाबलावरच आधारित आहे.

विकास राऊत, औरंगाबादविधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे व इतर सर्व पक्ष मैदानात उतरले असून, सर्वांची ताकद महापालिकेतील पक्षीय बलाबलावरच आधारित आहे. शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघांत पालिकेचे ९९ वॉर्ड विभागले गेले आहेत. मतदारसंघ विभाजनामुळे मनपात सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपाची ताकद विभागली गेली आहे.दोन्ही पक्षांचे ४५ नगरसेवक चारही मतदारसंघांत विभागले गेल्यामुळे भाजपाला मोठा फटका बसला आहे. त्या तुलनेत काँग्रेस नगरसेवकांचे सर्वाधिक संख्याबळ हे पूर्व मतदारसंघात आहे. पश्चिम आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ चार मतदारसंघांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच आहे. त्यातील काही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामे दिले आहेत. तर मनसेचा एक नगरसेवक पालिकेत असून, तोही मध्य मतदारसंघात आहे. शिवसेना-भाजपाकडे ५६ नगरसेवकांचे संख्याबळ असले तरी महायुतीचा घटस्फोट झाल्यामुळे तो गट फुटला आहे. काँग्रेसकडे ३१ नगरसेवकांचा गट कायम आहे. राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांमध्येही फूट पडली आहे. तर भाजपाचे १५ नगरसेवक चार मतदारसंघांमध्ये विभागल्याने कुणाचाही कुणाला मेळ राहिलेला नाही. काँग्रेसचा गड पूर्व मतदारसंघ पूर्व मतदारसंघ हा पूर्णत: शहर मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मनपाचे सर्व मिळून ३४ वॉर्ड येतात. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे १३ नगरसेवक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त ४ तर भाजपाचे ५ नगरसेवक आहेत. काँग्रेसनंतर विचार केला तर शिवसेनेचे ९ तर अपक्ष ३ नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघाने ३३६४ मतांची आघाडी दिली होती. ‘मध्य’ मध्ये शिवसेनेला बळ ‘मध्य’मतदारसंघात शिवसेनेला सर्वाधिक बळ आहे. शिवसेनेचे दहा नगरसेवक त्या मतदारसंघात आहेत. तर १३ अपक्षांपैकी काही काँगे्रसच्या सोबत आहेत. काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजपाचे ३ आणि शहर प्रगती आघाडीचे ३ नगरसेवक त्या मतदारसंघात आहेत. हा मतदारसंघ शहरातील जुन्या वॉर्डांतून तयार झालेला आहे. ऐतिहासिक वास्तूंचा हा मतदारसंघ आहे. सेनेला बळ असतानाही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला १९४६ मतांची आघाडी होती. ‘पश्चिम’मध्ये शिवसेनेची ताकदपश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक १० नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाला तेथून मोठ्या प्रमाणात ताकद मिळालेली आहे. काँग्रेसचे २, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि भाजपाचे फक्त ३ नगरसेवक त्या मतदारसंघामध्ये आहेत. अपक्ष ५ नगरसेवक त्या मतदारसंघात असून, काही जण सेनेसोबत होते. मात्र, त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा निवडणुकीत सेनेला या मतदारसंघातून ३५ हजार ८२८ मतांची आघाडी होती.