योजना अनेक, लाभार्थी एकच

By Admin | Updated: December 7, 2015 01:00 IST2015-12-07T00:41:26+5:302015-12-07T01:00:31+5:30

बीड : गोरगरिबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा जिल्ह्यात बाजार मांडला जात आहे. एकाच लाभार्थ्यांचे विविध योजनेत नाव लावून स्वस्त धान्य लाटण्याचा प्रकार जिल्हयात सुरू आहे.

Many of the plans, the beneficiaries are the same | योजना अनेक, लाभार्थी एकच

योजना अनेक, लाभार्थी एकच


बीड : गोरगरिबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा जिल्ह्यात बाजार मांडला जात आहे. एकाच लाभार्थ्यांचे विविध योजनेत नाव लावून स्वस्त धान्य लाटण्याचा प्रकार जिल्हयात सुरू आहे. ही बाबा जिल्हा पुरवठा विभागाने गांभीर्याने घेतली असून कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.
बीड तालुक्यातील एका गावातील रेशन दुकानदाराने एकाच व्यक्तीचे एपीएल, बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा या चारही योजनेत नावे लावून स्वस्त धान्य लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून कारवाईच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने गोरगरीबांसाठी चार योजने अंतर्गत स्वस्त धान्य वितरीत करण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र रेशन दुकानदारांकडून बोगस नावे यादीत दाखवून धान्य लाटले जात असल्याचा प्रकार बीड तालुक्यासह जिल्हयात ठिकठिकाणी होत आहे. याबाबत आता पुरवठा विभाग खडबडून जागे झाले असून संबंधीत दुकानदारवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Many of the plans, the beneficiaries are the same