शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘मांजरा’चे पाणी बंद !

By admin | Updated: May 18, 2014 00:47 IST

मधुकर सिरसट , केज धारूरसह एकूण १४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मांजरा धरणातील पाणीपातळी खालावल्यामुळे मांजरातून होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे.

 मधुकर सिरसट , केज धारूरसह एकूण १४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मांजरा धरणातील पाणीपातळी खालावल्यामुळे मांजरातून होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. केज शहराच्या पाणीटंचाईला दूर करण्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून ३९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मांजरातील पाण्याचा एकूण साठा ०३.३८७ द.ल.घ.मी.पर्यंत खालावल्यामुळे मांजरा धरणात चर खोदूनही पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीकडे पाणी येणे बंद झाल्यामुळे मांजरातील पाणीपुरवठा कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे केज शहरातील पाणीटंचाई वाढली आहे. मागील महिन्यात विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन पाणीटंचाईवर उपाययोजना सुचविल्या होत्या. येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे पाणीपुरवठ्याच्या पर्यायी योजनेसाठी निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी तेराव्या वित्त आयोगातून केज शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी ३८ लाख ७९ हजार ७१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून युद्धपातळीवर काम करून नागरिकांच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिले जाईल, असे नगराध्यक्षा शीतल दांगट, उपनगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हा निधी मिळाल्यामुळे केज शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल, असा विश्वास मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला. टँकरने मोफत पाणी केज नगर पंचायतीचे विरोधी गटनेते हारूण इनामदार यांनी केज शहरातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन तीन महिन्यांपूर्वीच निधन झालेल्या वडिलांच्या स्मरणार्थ कै. चांदपाशा इनामदार यांच्या नावाने ५ मेपासून ५ जून या एक महिन्यासाठी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यास पुढाकार घेतला आहे. ६ कि.मी. अंतरावरून टँकरने पाणी आणून पाणीटंचाई असलेल्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज ५ ते ६ टँकरच्या खेपा करण्यात येत असून हे सर्व पाणी मोफत देण्यात येत आहे. ५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे एक महिनाभरासाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे हारूण इनामदार यांचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. निधी कशासाठी मंजूर? मांजरा धरणातून होणारा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद झाल्याने केज शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आयोगाकडून मिळालेला निधी हा जाधव जवळा पाझर तलावातून केजसाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आरसीसी, सिमेंटची टाकी बांधणे, प्रभाग १ चे १६ मध्ये आवश्यकतेनुसार विंधनविहिरी खोदणे, त्यावर मोटारी बसविणे, पाईपलाईन करणे यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा निधी मिळणार आहे.