शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र चोरटा पुंडलिकनगर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:36 IST

आरोपीचा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्दे विद्यानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ लुटल्याचे चोरट्याने सांगितले. 

औरंगाबाद: २० आॅगस्ट रोजी रात्री विद्यानगर येथे  वृद्ध महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची मोहन माळ आणि  चेन  हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला पुंडलिकनगर पोलिसांनी २६ आॅगस्ट रोजी मोठ्या शिताफिने सिडको एन-३ मधील छत्रपती महाविद्यालय परिसरात पकडले. यावेळी आरोपीचा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राहुल उर्फ राणा बाजीराव सोळंके (२२)असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार बॉबी उर्फ ऋषिकेश झिजुंर्डे हा पसार आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील सविता नारायण कुलकर्णी या २० आॅगस्ट रोजी रात्री  शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास त्या विद्यानगर येथील रस्त्याने घरी जात असताना मोटारसायकलस्वार चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची मोहनमाळ आणि १४ ग्रॅम सोन्याची चेन  हिसकावून नेली होती. याविषयी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यावेळी त्यांनी चोरट्यांचे वर्णनही सांगितले होते. तेव्हापासून उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,   उपनिरीक्षक विकास खटके,पोहेकॉ रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, नितेश जाधव, प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड, दिपक जाधव यांनी तपास सुरू केला.

तेव्हा सिडको एन-३ मधील छत्रपती महाविद्यालयाजवळ दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी तेथे धाव घेतली तेव्हा पोलिसांना पाहून बॉबी उर्फ ऋषिकेश हा पळून गेला. तर आरोपी राणा उर्फ राहुल हा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीअंती राहुलने गुन्ह्याची कबुली देत २० आॅगस्ट रोजी रात्री बॉबीच्या मदतीने विद्यानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ  लुटल्याचे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस