शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात राकाँ- भाजपात ‘स्ट्रेट फाईट’

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पुरुषोत्तम करवा, माजलगाव माजलगाव मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उलथापालथीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत़

पुरुषोत्तम करवा, माजलगावमाजलगाव मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उलथापालथीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत़ बंडाळी रोखण्याचे आव्हान प्रमुख पक्षांपुढे राहणार आहे़ पक्ष तितके नेते अशी स्थिती असली तरी येत्या विधानसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्येच सरळ लढत होईल़प्रकाश सोळंके हे सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत़ दोनदा भाजपाकडून तर एकदा राष्ट्रवादीकडून ते विधानसभेत पोहोचले़ सध्या ते राष्ट्रवादीच्या आश्रयाला आहेत़ यावेळी देखील तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील़ लोकसभा निवडणुकीत माजी आ़ राधाकृष्ण होके पाटील, भारिपचे बाबूराव पोटभरे यांनी गोपीनाथराव मुंडेंच्या मागे उभे राहणे पसंत केले़ मुंडेंना तब्बल ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले़त्यामुळे विधानसभेत हे मताधिक्य कमी होते की आहे तसेच राहते? यावरच जय- पराजय अवलंबून आहे़भाजपात आऱ टी़ देशमुख, भाई गंगाभीषण थावरे, माजी आ़ राधाकृष्ण होेके पाटील, डॉ़ प्रकाश आनंदगावकर, अरुण राऊत अशी फौज आहे़ देशमुख, थावरे यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु आहे़ ऐनवेळी बाबूराव पोटभरे हे देखील उमेदवारीवर दावा करु शकतात़ त्यामुळे पक्ष कोणाला संधी देतो? याची सर्वांना उत्कंठा आहे़ भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने माजलगावातील नेत्यांचा आधार हरवला आहे़ अशा स्थितीत उमेदवारीसाठीही झगडावे लागेल अशी शक्यता आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीत आ़ प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, सहाल चाऊस, जिल्हाध्यक्ष अशोक डक, रमेश आडसकर या मातब्बरांचा समावेश आहे़ मात्र, या नेत्यांमधून विस्तवही जात नाही़ त्यामुळे बंडखोरीचा सामना भाजपाबरोबर, राष्ट्रवादीलाही करावा लागेल, अशीच स्थिती आहे़संघटनांची भूमिका महत्त्वाचीमाजलगावात सामाजिक संघटनाही अस्तित्व टिकवून आहेत़ बाबूराव पोटभरे यांनी भारिपला रामराम ठोकून बहुजन विकास मोर्चाची मुहूर्तमेढ रोवली़ त्यांचा मतदारसंघात प्रभाव आहे़ डॉ़ उद्धव नाईकनवरे हा नवखा तरुण ‘आव्हान’ संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांसाठी झगडतो आहे़ माजलगाव धरणातील मच्छीमारांसाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केलेले आहे़ विजयाचे वर्तूळ पूर्ण करण्यासाठी या संघटनांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे़राष्ट्रवादीप्रकाश सोळंके८६,९४३भाजपाआर.टी. देशमुख७९,०३४शेकापभाई गंगाभीषण थावरे१०,०७७इच्छुकांचे नाव पक्षप्रकाश सोळंकेराकाँ.सहाल चाऊसराकाँआर.टी. देशमुखभाजपाभाई थावरेभाजपालोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना ३४,२३७ एवढे मताधिक्य