शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:39 IST

२८ लाख ५० हजार मतदारांच्या बोटावर लागेल शाई

ठळक मुद्दे३०३७ मतदान केंद्र आहेत जिल्ह्यात  प्रत्येक बुथवर दोन बाटल्या

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मुंबईहून जिल्ह्यात ९२९१ शाईच्या बाटल्या पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ५ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत ३४ हजार ४५६ नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. हळूहळू प्रचाराचा पारा चढत आहे. २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. अवघ्या १० दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपल्याने निवडणूक विभागात लगीनघाई सुरूझाली आहे. मतदानासाठी लागणारी सर्व स्टेशनरी साहित्य आणण्यात आले आहे. सर्व स्टेशनरी जिल्ह्यातील १० निवडणूक निर्णय कार्यालयांकडे पाठविली जात आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३०३७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहे. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एकाबाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येते. यासाठी मुंबईहून ९२९१ शाईच्या बाटल्या आणण्यात आल्या (९३ लिटर) आहेत. जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. एकदा बोटावर लावण्यात आलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसत नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांच्या बोटावरील शाई आता मिटली आहे. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे. 

बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा २००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र,२००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी उभी रेषा मारली जात आहे. त्यामुळे शाई जास्त लागत आहे. 

१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करीत असतात.

१० मिली निळी शाई एका बाटलीत असते. ३५० मतदारांच्या बोटावर एका बाटलीमधून शाई लावतात.२८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे.शाई बोटावर लावल्यानंतर १५ सेकंदात तिचा ओलसरपणा जातो. ही शाई पुसता येत नाही.शाई लावल्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात. डाव्या तर्जनीची तपासणी करून देणारी व्यक्ती मतदानासाठी अपात्र ठरू शकते.एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल, तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादVotingमतदान