शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गंगापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थितीगंगापूर : मृग नक्षत्रापासून आर्द्रा नक्षत्रापर्यंत जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आर्द्रा संपता संपता आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी पांडुरंगाच्या आशीर्वादाने तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित होऊन पुढे जोराचा पाऊस येणार, या आशेने शेतातील थोड्याफार ओलीवर खरीप हंगामातील अधिक आर्थिक उत्पन्न येणारे कपाशी व मका या पिकांची लागवड मोठ्या जोमाने सुरू केली होती. त्यानंतर पावसाने पुन्हा डोळे वटारल्याने शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले असून, लागवड केलेल्या पिकास वेळीच पाऊस न झाल्यास बी-बियाणे वाया जाणार व पुढेही लागवडीस उशीर होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस येत नसल्याने व्यापारी व कृषी व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, कृषी व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत लाखो रुपयांचा माल उठाव नसल्याने पडून आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे. पाऊस पडावा यासाठी शेतकरी वर्गासह व्यापारी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.वेरूळ परिसरात निराशावेरूळ : परिसरात अर्धा आषाढ संपला तरी पावसाने पाठ फिरविली आहे. नांगरट केलेली ढेकळं शेतात तशीच असल्याने संपूर्ण परिसरातील पेरणी ठप्प झाली आहे. एकादशीला हमखास पाऊस येईल, पंढरपूरच्या विठोबाची कृपा होईल, या आशेने धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पाऊस न आल्याने निराशा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर पेरणी केली आहे, त्या पिकांचीही पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. नदी-नाले कोरडेठाक असून, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. आता बळीराजाकडे चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात बेभाव पशुधन बाजारात चालले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असून, जागोजागी चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मजुरांची शहराकडे धावशेतीची कामे बंद, धंदे बंद असल्यामुळे मजुरांचे जथे शहराकडे धावू लागले आहेत. त्यामुळे मोठमोठी गावे बकाल होत असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. याकडे वन विभाग, कृषी विभाग व महसूल विभाग यांनी गांभीर्याने घेऊन मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.पिंप्रीराजा परिसरात प्रतीक्षापिंप्रीराजा : काही दिवसांपूर्वी झालेल्या थोड्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली; पण नंतर पाऊस झालाच नाही, त्यामुळे पेरलेले बी-बियाणे वाया जाते की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतित झाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)बाजारसावंगी परिसरात दुबार पेरणी सुरूबाजारसावंगी : परिसरात पहिली पेरणी वाया गेली असल्याने शेतकरी दुबार पेरणीकडे वळला असून, अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने अर्धा पावसाळा उलटला जात असताना नदी-नाले, विहिरी कोरड्याठाक आहेत. २० जून रोजी बाजारसावंगी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीस उशीर होत असल्याचे पाहून सर्वत्र शेतकऱ्यांनी कापूस, मका, तूर पिकाची पेरणी उरकली; मात्र यानंतर पावसाने तब्बल पंधरा ते वीस दिवसांची उघडीप दिल्याने पहिली पेरणी पूर्णपणे वाया गेली. यामुळे पहिल्या पेरणीची मशागत, बियाणे वाया गेले. ढग येतात... जातात... दररोज पडणारे कडक ऊन, दुपारनंतर येणारे ढग निघून जात असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आषाढी एकादशीला पडलेल्या तुरळक पावसाने शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणीस सुरुवात केली आहे; मात्र अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. दुबार पेरणी सुरू असल्याने त्रस्त शेतकऱ्यांना मोफत, तसेच अनुदान स्वरूपात कापूस, मका बियाणांचे वाटप करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.उंडणगावात दुबार पेरणीचे संकट, अनेक शेतकऱ्यांनी केली मक्याची धूळपेरणी उंडणगाव : येथे ६ जुलै रोजी झालेल्या पावसानंतर पाऊस नसल्याने उगवून आलेले पीक वाळण्याचा धोका असून, दुबार पेरणीचे संकट आले; मात्र येथील खंडाळा व गोळेगाव परिसरात पेरणीयोेग्य पाऊस नसल्याने या भागातील शेतकरीदेखील पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची धूळपेरणी केली होती. आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मका उगवला; मात्र प्रचंड उष्णता व पाऊस गायब झाल्याने ही कोवळी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आलेली मदत काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; मात्र यादीत नाव नाही, अशा शेतकऱ्यांची नावे पुन्हा पाठविली; मात्र अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी वर्गात संताप आहे. दुबार पेरणीसाठी शासनातर्फे बियाणे व खत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.