शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यावर नजर

By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST

बीड : येथील विद्यानगर पूर्व भागामध्ये दोघांना मोबाईल फॉरमॅट करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलत असताना रंगेहाथ पकडण्यात आले़

बीड : येथील विद्यानगर पूर्व भागामध्ये दोघांना मोबाईल फॉरमॅट करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलत असताना रंगेहाथ पकडण्यात आले़ यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात मोबाईल फॉरमॅट करणाऱ्या व्यावसायिकांच्या पाहणीची मोहीम हाती घेतली आहे़जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरीचे मोबाईल खरेदी करुन त्यांचा आयएमइआय क्रमांक बदलला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दोघे ताब्यात घेतले आहेत़ विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या संगणकावर एका नामांकित कंपनीचे सॉफ्टवेअर होते़ त्यामुळे त्यांना मोबाईल आयएमइआय क्रमांक बदलणे सहज शक्य झाले होते़ हे सॉफ्टवेअर जिल्ह्यात इतर ठिकाणी आहे काय ? कोणाला त्याचा पुरवठा केला आहे काय ? याची तपासणी मोहिमेद्वारे करण्यात येत आहे़ बहुतांश वेळा चोरीला गेलेले मोबाईल फॉरमॅट करणाऱ्या व्यक्तींकडे दिले जातात, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली आहे़ त्यामुळे अशा प्रकारचा गोरख धंदा कोठे आणखी सुरु आहे काय ? याची पाहणी करण्यात येत आहे़ आयएमइआय क्रमांक बदलणे अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे पोलिसांनी लक्ष दिले आहे़ त्यातूनच मोहीम सुरु करण्यात आली आहे़ चोरीच्या मोबाईलला नवीन आयएमइआय नंबर टाकल्यास तो नंबर ट्रेस करणे पोलिसांना अवघड बनते़ अशा मोबाईलचा वापर घातपातासाठी केला जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नसल्याने याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे़ त्यामुळे ज्या ठिकाणी मोबाईलची दुरुस्ती किंवा मोबाईल फॉरमॅट केले जातात त्या दुकानाची गरज पडल्यास पाहणी करण्यात येत आहे़ मोबाईलच्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जात आहेत याचीही पाहणी करण्यात येत आहे़ बीड येथून पकडलेल्या दोघांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याद्वारे इतर गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते दोघांना४ताब्यात घेतलेल्या संगणकामधून स्पेशल सॉफ्टवेअर असल्याचे आले समोऱ४याची दखल घेत मोबाईल फॉरमॅट करणाऱ्यांची तपासणी सुरु४चोरीचे मोबाईल आणून बदलला जायचा आयएमइआय क्रमांक४आयएमइआय बदलेल्या मोबाईलचा होऊ शकतो घातपातासाठी वापर४स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दुकानाची तपासणी सुरु