शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही

By admin | Updated: July 26, 2014 00:42 IST

वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे.

वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेनेला नाही तर मोदीला मतदान झाले. आता विधानसभेत मात्र तसे होणे शक्य नाही. आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वसमत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.येथील मयुर मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय निर्धार मेळावा शुक्रवारी पार पडला. मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यमंत्री फौजिया खान, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. विक्रम काळे, माजी खा. गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. शिवाजी माने, सुरेश वरपुडकर, प्रताप देशमुख, अरविंद चव्हाण, दिलीप चव्हाण, विनोद झंवर, रत्नमाला शिंदे, जगजित खुराणा, सभापती राजू पाटील नवघरे, देवीदास कऱ्हाळे, अ‍ॅड. डी. बी. पार्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी केले. माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी बोलताना जागा वाटपाबाबत जो निर्णय द्यायचा तो पक्षाने द्यावा, आमच्यावर जी जबाबदारी द्याल ती आम्ही पार पाडू मात्र स्वाभीमान गहाण टाकणारी जबाबदारी आमच्यावर टाकू नका, असे आवाहन केले. यावेळी माजी खा. गणेशराव दुधगावकर, फौजिया खान यांनीही मार्गदर्शन केले.आ. दांडेगावकर यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. तिन्ही जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्धार केला तर योग्य उमेदवारही आहेत व तिन्ही जागा निवडणुनही येतील, असा विश्वास व्यक्त केला. वसमत मतदारसंघात काहीजण आपल्यासोबत होते. आता कोणी कमळ घेवून फिरत आहेत. तरी कोणी पक्ष निश्चित झाला नसला तरी निवडणूक लढवण्याची भाषा करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता अ‍ॅड. शिवाजीराव जाधव व उज्वला तांभाळे यांना लगावला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी कधी एखादी सहकारी संस्था, कारखाना, सोसायटी तरी काढली का? कोणाला रोजगार मिळवून दिला का? असा प्रश्न उपस्थित केला. दिल्लीत शरद पवार यांचे वजन होते. कृषीमंत्री म्हणून ते देशभर ओळखले जात होते. आज केंद्रीय कृषीमंत्री कोण आहेत? त्यांचे नावही कोणाला माहित नाही, अशी टीका त्यांनी केली.पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. आगामी काळात एका विद्यापीठास बहिणाबाई चौधरी तर दुसऱ्या विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण दिले. सुकन्या योजना राबवली. डीआरडीसाठी घरे देण्यासाठी तरतूद केली. डीपीडीसीसाठी ८० कोटी रुपये दिले. सर्वांगिन विकासाच्या योजना शासनाने राबवल्या असल्याचेही सांगत पाच वर्षातील शासनाच्या कामकाजाच्या लेखा जोखाही त्यांनी मांडला. सूत्रसंचालन प्रा. सुभाष मस्के यांनी केले. (वार्ताहर)सन्मानजनक जागा वाटप व्हावे- सुनील तटकरेप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाषणात काँग्रेसला खडेबोल सुनावत मराठवाड्यात जे काँग्रेसचे दोन खासदार दिसत आहेत ते राष्ट्रवादीमुळेच आहेत, हे विसरू नका, असा इशारा दिला. शरद पवार यांच्यामुळेच १५ वर्ष आघाडीचे सरकार आहे व त्यामुळेच काँग्रेसला १५ वर्षापासून मुख्यमंत्रीपद मिळत आहे. याचीही आठवण ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. आघाडी व्हावी, ही भूमिका आहे; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली शक्ती पाहता जागा वाटप सन्मानजनक व्हावे, गतवेळी कळमनुरी मतदार संघ काँग्रेसला दिला होता. तो आता काँग्रेसला हवा आहे, असा सुचक इशाराही त्यांनी दिला व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सत्तेवर आणण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.