शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘साक्षर भारत’ ठप्प !

By admin | Updated: May 19, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : निरक्षरांना अक्षर ओळख व्हावी, या उद्देशाने निरंतर शिक्षण विभागाच्या साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे.

उस्मानाबाद : निरक्षरांना अक्षर ओळख व्हावी, या उद्देशाने निरंतर शिक्षण विभागाच्या साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र प्रौढांणा शिक्षणाचे धेडे देणार्‍या १ हजार २४४ प्रेरकांना मागील १९ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. जिल्हाभरातील सुमारे ६२१ ग्रामपंचायतीतील रात्रीचे वर्ग बंद आहेत. प्रौढ व्यक्तींचे निरक्षरतेचे प्रमाण लक्षात घेवून शासनाने साक्षर भारत अभियान सुरु केले. हे अभियान यशस्वीरित्या राबविले जावे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागात शिक्षणाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला या अभियानाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कालांतराने या अभियानांतर्गत प्रौढांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. नेमण्यात आलेल्या प्रेरकांचे मानधन वेळेत न मिळाल्यामुळे या अभियानालाच मरगळ आली आहे. जिल्हाभरात ६२१ ग्रामपंचायती अंतर्गत रात्रीचे वर्ग सुरु होते. विशेष म्हणजे यावर्षी तब्बल ४ हजार ८४३ प्रौढ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. हे अभियान चांगल्या पद्धतीने सुरु असतानाच प्रेरकांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधनासाठी प्रेरकांकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र या आंदोलकांची वरीष्ठ कार्यालयाकडून केवळ आश्वासनावरच बोळवण केली गेली. वारंवार पाठपुरावा करुनही मानधन मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रेरकांनी हे वर्ग बंद केले आहेत. कष्टाचा मोबदला मिळत नसेल तर वर्ग तर चालविणार कसे? असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. जिल्हाभरात सुमारे १२४४ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. त्यांना प्रतिमहा २ हजार रुपये इतके मानधन ठरवून देण्यात आले होते. इतके तुटपुंजे मानधन असतानाही शासनाकडून ते वेळेवर मिळत नसल्याने जिल्हाभरातील प्रेरकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) कुटुंब सर्वेचे काम ७० टक्के होवूनही शासनाकडून ठेंगा जिल्ह्यातील कुटुंब सर्वेचे काम ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण करा, त्यानंतर मानधन दिले जाईल, हे गाजर शिक्षण संचालकांनी दाखविले होते. या आशेवर निरंतर शिक्षण विभागाने प्रेरकांच्या माध्यमातून कुटुंब सर्वेचे काम ८३ टक्के पूर्ण केले. त्यानंतर मानधनाची मागणी करण्यात आली. मात्र शिक्षण संचालक कार्यालयाने हा शब्द पाळला नाही. आता शंभर टक्के काम पूर्ण करा, असे सांगण्यात आले आहे. मात्र मानधनच मिळत नसल्याने काम तरी कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.