शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत चाळीस हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:05 IST

कळमनुरी: शहरातील विद्यानगर भागात घरमालकासह भाडेकरूंच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी ४० हजार रूपयांचा माल लंपास केल्याची घटना १ मेच्या रात्री घडली.

कळमनुरी: शहरातील विद्यानगर भागात घरमालकासह भाडेकरूंच्या घरावर डल्ला मारून चोरट्यांनी ४० हजार रूपयांचा माल लंपास केल्याची घटना १ मेच्या रात्री घडली.विद्यानगर भागातील शिक्षक सुरेश होडबे हे १ मे रोजी घराला कुलूप लावून आपल्या गावी गेले होते. याचा फायदा घेत चोरटयांनी कुलूप तोडून घरातील खोलीमध्ये प्रवेश केला. दरम्यान घरातील कपाट फोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याची अंगठी, आठ हजार रूपयाचा मोबाईल व ५०० रूपये नगदी असा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटयांनी आपला मोर्चा त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर किरायाने राहणाऱ्या सतीश पवार यांच्याकडे वळविला. किरायदार सुद्धा बाहेरगावी गेले असल्यामुळे चोरटयांनी घरात प्रवेश करून चांदीचे जोडवे, तीन ते चार हजार रूपये किंमत असलेली चांदीची मूर्ती चोरली. त्यानंतर चोरटे दुसऱ्या खोली जात असताना त्याठिकाणी झोपलेल्या एका मुलाला आवाज आल्याने त्याने उठून चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला, पण हाताला झटका देवून चोरटा पळ काढण्यात यशस्वी झाला. चोरी झाल्याचे शेजाऱ्यांना कळल्यानंतर फोनवरून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेच पोलिसांनी तेथे भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. तर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नसल्यामुळे शहरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी या घटनेच्या पार्श्वभुमीवर नागरिकांतून केली जात आहे. (वार्ताहर)