परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नोंद केलेल्या संस्थांना पत्र

By Admin | Updated: August 15, 2014 01:13 IST2014-08-15T00:55:52+5:302014-08-15T01:13:44+5:30

औरंगाबाद : इबोला या संसर्गजन्य आजाराप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश केंद्र व राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

Letters from foreign students to institutions registered for education | परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नोंद केलेल्या संस्थांना पत्र

परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नोंद केलेल्या संस्थांना पत्र

औरंगाबाद : इबोला या संसर्गजन्य आजाराप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश केंद्र व राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या आदेशानुसार चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळात परदेशी नागरिकांची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात येणार असून ६ आॅगस्टनंतर शहरातील काही शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठामध्ये परदेशातून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती द्यावी. यासाठी मनपा आरोग्य विभाग संबंधित संस्थांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने परदेशी नागरिक तपासणीसंदर्भात एक विशिष्ट फॉर्म जारी केला आहे. त्या फॉर्ममध्ये त्या नागरिकांची माहिती घेतली जाणार आहे. शहरात पूर्वीपासून वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिक, विद्यार्थ्यांच्या तपासणीची गरज नाही; परंतु ते नागरिक ६ आॅगस्टनंतर परदेशाहून येतील त्यांची तपासणी करावी लागेल.

Web Title: Letters from foreign students to institutions registered for education